बीड जिल्ह्यात कोरोनाचा धोका वाढला, नाईट कर्फ्यू लागू ; जिल्हाधिकाऱ्यांकडून आदेश जारी?

बीड जिल्ह्यातील सर्व हॉटेल, खानावळ, बार, रेस्टॉरंट, ग्राहकांसाठी संपूर्णत: बंद राहतील. फक्त पार्सल सेवा सुरु राहणार आहेत. तर सर्व मंगल कार्यालये, फंक्शन हॉल आणि इतर कार्यक्रमांवर १८ मार्च रोजीच्या नंतर अनिश्चित काळासाठी बंद राहणार आहे. तसेच जिल्ह्यातील फळ विक्रेते, भाजीपाला, सर्व दुकाने, आस्थापने आणि दूध विक्रेते दररोज सायंकाळी ७ ते सकाळी ७ पर्यंत बंद राहतील.

    बीड : बीड जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यात नाईट कर्फ्यू लागू करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी आदेश काढले आहेत. बीड जिल्ह्यामध्ये सायंकाळी सात ते सकाळी सातपर्यंत वाजेपर्यंत कर्फ्यू लागू करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी घेतला आहे. तसंच या वेळेत अत्यावश्यक सेवा वगळता जिल्ह्यातील सर्वच व्यवसाय बंद राहणार आहेत.

    बीड जिल्ह्यातील सर्व हॉटेल, खानावळ, बार, रेस्टॉरंट, ग्राहकांसाठी संपूर्णत: बंद राहतील. फक्त पार्सल सेवा सुरु राहणार आहेत. तर सर्व मंगल कार्यालये, फंक्शन हॉल आणि इतर कार्यक्रमांवर १८ मार्च रोजीच्या नंतर अनिश्चित काळासाठी बंद राहणार आहे. तसेच जिल्ह्यातील फळ विक्रेते, भाजीपाला, सर्व दुकाने, आस्थापने आणि दूध विक्रेते दररोज सायंकाळी ७ ते सकाळी ७ पर्यंत बंद राहतील.

    दरम्यान, बीड शहरातील अनेक व्यापारी दुकानदार आणि दुकानात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचं उघड झालं असल्याने जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे.