उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या दणक्याने बीड नगरपीलिकेचे सीओ गुट्टे लागले शहर स्वच्छतेच्या कामाला…

शहरातील धूळ सह अस्वच्छता पाहून उपमुख्यमंत्री अजित दादा पवार नगर पालिका सीओ डॉ. उत्कर्ष गुट्टे यांच्यावर चांगलेच भिडले. आरे तू आधी डॉक्टर झाला पुन्हा एम.पी.एस.सी. पास झाला. शहरात किती घाण आहे रे , तुला लाज कशी वाटत नाही. अशा शब्दात फैलावर घेत पुढच्या दौऱ्यात ही अशीच अस्वच्छता दिसली तर घरी पाठवल्याशिवाय राहणार नाही असा दणका पवारांनी दिला होता.

    बीड : कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात आली असल्याने तसेच संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पूर्व तयारीसाठी आणि आढावा घेण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्य मंत्री राजेश टोपे, पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी काल (शुक्रवारी) बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली.

    दरम्यान यावेळी शहरातील धूळ सह अस्वच्छता पाहून उपमुख्यमंत्री अजित दादा पवार नगर पालिका सीओ डॉ. उत्कर्ष गुट्टे यांच्यावर चांगलेच भिडले. आरे तू आधी डॉक्टर झाला पुन्हा एम.पी.एस.सी. पास झाला. शहरात किती घाण आहे रे , तुला लाज कशी वाटत नाही. अशा शब्दात फैलावर घेत पुढच्या दौऱ्यात ही अशीच अस्वच्छता दिसली तर घरी पाठवल्याशिवाय राहणार नाही असा दणका पवारांनी दिला होता.

    त्यामुळे आज सकाळपासून नगरपालिकेचे कर्मचारी स्वच्छता करतांना दिसून आले असून उपमुख्यमंत्री यांच्या दणक्यात नगरपालिकेचे मुजोर कर्मचारी ताळ्यावर आल्याचे दिसले.