पंचनामे होऊनही मदत नाही, बीडमधील शेतकऱ्यांचा रस्त्यावरच ठिय्या

अतिवृष्टीत खरीप हंगामातील सर्वच पिके वाया गेली. परंतु सरकारकडून अद्याप पंचनामा करून कसलीही मदत मिळाली नाही. यामुळे बीडमधील शेतकरी आक्रमक झाले आहेत.

    बीड : दहा दिवसापूर्वी झालेल्या अतिवृष्टीत खरीप हंगामातील सर्वच पिके वाया गेली. परंतु सरकारकडून अद्याप पंचनामा करून कसलीही मदत मिळाली नाही. यामुळे बीडमधील शेतकरी आक्रमक झाले आहेत.

    दरम्यान ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तत्काळ मदत करावी या मागणीसाठी सिपीआयच्या वतीने राष्ट्रीय महामार्गावरील गंगामसाला येथे रस्त्यावरच ठिया घालण्यात आला.