अप्पा, तुम्ही अजूनही आमच्यातच आहात, धनंजय मुंडेंचं भावनिक अभिवादन

भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांची आज (शनिवार) जयंती आहे. त्यानिमित्त विविध राजकीय पक्षातील नेत्यांनी त्यांना आदरांजली वाहिलीय. त्यांचे पुतणे धनंजय मुंडे यांनी आप्पा अजूनही आपल्यातच असल्याचं म्हटलंय.

भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणी त्यांचे पुतणे आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी जागवल्या. आपल्या काकांना ट्विटरवरून त्यांनी अभिवादन केलंय. गोपीनाथ मुंडेंना धनंजय मुंडे हे आप्पा म्हणत असत.

भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांची आज (शनिवार) जयंती आहे. त्यानिमित्त विविध राजकीय पक्षातील नेत्यांनी त्यांना आदरांजली वाहिलीय. त्यांचे पुतणे धनंजय मुंडे यांनी आप्पा अजूनही आपल्यातच असल्याचं म्हटलंय.

आपल्या ट्विटमध्ये ते म्हणतात, अप्पा, खरंतर जयंतीसारखे शब्द तुमच्याबद्दल मनाला भावतच नाहीत. तुम्ही अजूनही आमच्यात आहात, ही भावना कायम मनात असते. त्याच  प्रेरणेतून मी दीन-दुबळ्यांची, ऊसतोड मजुरांची सेवा करण्याचा, त्यांची उन्नती साधण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतोय. स्व. अप्पांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.

आजच्याच दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचादेखील वाढदिवस आहे. त्यांनादेखील ट्विट करून धनंजय मुंडेंनी शुभेच्छा दिल्यात. पवार साहेब, एक नाव नाही तर कारकीर्द आहे, असं म्हणत त्यांनी पवारांना शुभेच्छा दिल्यात. त्यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थनाही केलीय.