Dhananjay Munde called and inquired about Pankaja Munde's health

बीड जिल्हा बँकेची (Beed District Bank elections) आज आठ जागांसाठीची निवडणूक होत आहे. या निवडणुकीवर भाजपाने बहिष्कार टाकला आहे. माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी हानिर्णय जाहीर केला. भाजपच्या या निर्णयानंतर राष्ट्रवादीचे (NCP) नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhanjay Munde) यांनी थेट पंकजा मुंडेंवर निशाणा साधला आहे.  या निवडणुकीमुळे मुंडे बहिण-भावात पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडली आहे.

  बीड : बीड जिल्हा बँकेची (Beed District Bank elections) आज आठ जागांसाठीची निवडणूक होत आहे. या निवडणुकीवर भाजपाने बहिष्कार टाकला आहे. माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी हानिर्णय जाहीर केला. भाजपच्या या निर्णयानंतर राष्ट्रवादीचे (NCP) नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhanjay Munde) यांनी थेट पंकजा मुंडेंवर निशाणा साधला आहे.  या निवडणुकीमुळे मुंडे बहिण-भावात पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडली आहे.

  ‘पराभवाची अब्रू वाचवण्यासाठी बीड जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भाजपच्या माजी मंत्र्यांचा पळपुटेपणा केला’ असे म्हणत धनंजय मुंडे (Dhanjay Munde) यांनी पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्यावर जहरी टीका केली.

  ‘सहकार मंत्र्यांनी यांनी जिल्हा बँक संदर्भात जो निर्णय दिला. त्यानिर्णया विरोधात माजी मंत्री हाय कोर्टापासून ते सुप्रीम कोर्टापर्यंत लढले. हायकोर्टाने सहकार मंत्र्यांना दिलेला निर्णय कायम ठेवला. हायकोर्टाने दिलेला निर्णय भाजपाच्या माजी मंत्र्यांना मात्र मान्य झालं नाही. भाजपाकडे मतदार जास्त असताना देखील बहिष्कार टाकणं म्हणजे, यांचे मतदार यांचं ऐकत नाहीत, अशी स्थिती दिसून येत असल्याचा टोला धनंजय मुंडेनी लगावला.

  २१ तारखेला निकालाच्या दिवशी जी नामुष्की ओढवणार होती. ती थोडीशी अब्रू वाचविण्यासाठी भाजपने निवडणुकीवर बहिष्कार पळपुटेपणापणा केला, असा आरोप धनंजय मुंडे यांनी केला.

  भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकत एकही मतदार उमेदवार निवडणुकीत सहभागी होणार नाही, असा निर्णय घेतला. त्यानंतर धनंजय मुंडे यावर प्रतिक्रिया देताना पंकजा मुंडेंवर सडकून टीका केलेय.

  महाविकास आघाडीही ही निवडणूक अत्यंत ताकतीने लढणार आहे. बीड जिल्हा बँकेच्या 19 पैकी 9 जागांवर निवडणूक होत आहे. मतदानाच्या आदल्या दिवशीच भाजपने निवडणुकीतून माघार घेतली आहे. ऐनवेळी निवडणूक प्रक्रियेतून माघार घेणे म्हणजे त्यांना विजयाबद्दल शास्वती नसल्याचे धनंजय मुंडे म्हणाले. तसेच या निवडणुकीत महाविकास आघाडीचाच विजय होईल असा विश्वासही धनंजय मुंडेनी व्यक्त केला.