धनुभाऊने ट्विटद्वारे दिला पंकजाताईला धीर म्हणाले, ताई मोठा भाऊ म्हणून आपल्या सोबत आहे

    बीड : राज्याचे आमजीक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी बहीण पंकजा मुंडे यांना कोरोनाची लागण झाल्याचे कळताच त्यांच्या ट्विटर अकाउंट द्वारे पंकजाताई ची विचारपूस केली व काळजी घेण्यास सांगितले व एक मोठा भाऊ म्हणून मी आपल्या सोबत असल्याचा धीर देत आपुलकीने विचारपूस देखील केली ,ट्विट करत धनंजय मुंडे यांनी प्रतिक्रीया दिली आहे.

    धनंजय मुंडे यांचं ट्विट

    “ताई, या विषाणूचा सामना मी दोनवेळा केलाय, यामुळे होणाऱ्या त्रासाची मला जाणीव आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याने तातडीने योग्य उपचार घ्या. घरच्या सर्वांची टेस्ट करून घ्या, मोठा भाऊ म्हणून मी सोबत आहेच. प्रभू वैद्यनाथाच्या आशीर्वादाने आपण लवकरच बऱ्या व्हाल, काळजी घ्या @Pankajamunde ताई.”