बीडमधील खळबळजनक घटना; कोविड रुग्णालयातच कोरोना बाधित रुग्णाची गळफास घेऊन आत्महत्या

रामलिंग महादेव सानप (वय 35 रा. तांदळ्याचिवाडी ता.बीड ) असे आत्महत्या केलेल्या रुग्णाचे नाव आहे. घटनास्थळी बीड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवी सानप यांनी धाव घेत घटनेची घेतली. या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली असून पोलीस पुढील तपास करत आहे.

    बीड : गळ्यातील रुमालाने गळफास घेऊन कोरोना बाधित रुग्णाने आत्महत्या केली. ही खळबळजनक घटना बीड शहरातील दीप हॉस्पिटलमध्ये शुक्रवारी पहाटेच्या सुमारास उघडकीस आली.

    दरम्यान या घटनेने खळबळ उडाली असून घटनास्थळी शहर पोलिसांनी धाव घेतली आहे.
    रामलिंग महादेव सानप (वय 35 रा. तांदळ्याचिवाडी ता.बीड ) असे आत्महत्या केलेल्या रुग्णाचे नाव आहे. घटनास्थळी बीड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवी सानप यांनी धाव घेत घटनेची घेतली. या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली असून पोलीस पुढील तपास करत आहे. कोरोनाकाळामध्ये दीप हॉस्पिटल नेहमी चर्चेत राहिलेले आहे. या घटनेने पुन्हा आणखी चर्चेत आले आहे.