बीडच्या शिरुर कासार येथील कोविड केअर सेंटरमधून २२ रुग्णांचे पलायन; पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…..

सात दिवसात 22 रुग्ण पळून जाताना, आरोग्य विभाग आणि सुरक्षा रक्षक काय करत होते ? असा सवाल उपस्थित केला जात आहे. दरम्यान याप्रकरणी शिरूर कासार पोलीस ठाण्यात या 22 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    बीड : बीडच्या शिरूर कासार येथे सुरू असणाऱ्या केअर सेंटर मधून, तब्बल 22 रुग्णांनी पलायन केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.शिरूरच्या शासकीय वसतिगृह येथे कोविड सेंटर आहे.या सेंटरमध्ये सौम्य लक्षण असलेली किंवा फार त्रास नसलेल्या, कोरोना बाधित रुग्णांना ठेवून उपचार केले जातात.

    मात्र 14 मे ते 21 मे या सात दिवसात, या सेंटरमधून तब्बल 22 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांनी पळ काढल्याचे समोर आले आहे. तालुक्यातील शिरूर, बावी, आनंदगाव, घोगस पारगाव, पौंडुळ, जांब, मानूर, हिवरसिंगा,झापवाडी, दगडवाडी, नारायनवाडी या गावातील हे रुग्ण आहेत ज्यांनी उपचार अर्धवट सोडून पळ काढला आहे. तर या सात दिवसात 22 रुग्ण पळून जाताना, आरोग्य विभाग आणि सुरक्षा रक्षक काय करत होते ? असा सवाल उपस्थित केला जात आहे. दरम्यान याप्रकरणी शिरूर कासार पोलीस ठाण्यात या 22 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.