औष्णिक ऊर्जा निर्मितीसाठी कोळशाला बांबू हाच सक्षम पर्याय शेतकरी नेते पाशा पटेल यांचा दावा

“कोळशाचं आणि बांबूचा उश्मांक एक आहे. त्यामुळे पॅरिस करारानुसार आता कोळसा जाळणं हे माणसाच्या हिताचं नाहीय. आधीच आपण कार्बनने त्रस्त आहोत त्यात जमिनीतील कार्बन काढून ते हवेत सोडण्या पेक्षा जमिनीवर पिकलेल्या वस्तुतून कार्बन काढायचा आणि तो हवेत सोडला तर माणसाच्या हिताचा आहे. NTPC भारत सरकारने दादरी थर्मल पॉवरला या वापरासाठी ४०० कोटी रुपयांचं टेंडर देखील दिलं आहे. आणि याच धरतीवर महाराष्ट्र शासनानेही असा निर्णय घेण्याची आवशकता आहे.” असं पटेल म्हणाले.

    औष्णिक ऊर्जा निर्मितीसाठी आवश्यक असलेल्या कोळशाला आता बांबू हाच सक्षम पर्याय ठरण्याची शक्यता आहे. यासाठी विविध प्रयोग यशस्वी झाले असून, राज्याने ऊर्जानिर्मितीसाठी बांबू वापराचे धोरण स्वीकारले तर राज्यात पंचवीस लाख हेक्‍टरवरील बांबू लागवड दगडी कोळशाला प्रभावी पर्याय ठरेल असा दावा शेतकरी संघटनेचे नेते पाशा पटेल यांनी केला आहे. ते बीड मध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

    “कोळशाचं आणि बांबूचा उश्मांक एक आहे. त्यामुळे पॅरिस करारानुसार आता कोळसा जाळणं हे माणसाच्या हिताचं नाहीय. आधीच आपण कार्बनने त्रस्त आहोत त्यात जमिनीतील कार्बन काढून ते हवेत सोडण्या पेक्षा जमिनीवर पिकलेल्या वस्तुतून कार्बन काढायचा आणि तो हवेत सोडला तर माणसाच्या हिताचा आहे. NTPC भारत सरकारने दादरी थर्मल पॉवरला या वापरासाठी ४०० कोटी रुपयांचं टेंडर देखील दिलं आहे. आणि याच धरतीवर महाराष्ट्र शासनानेही असा निर्णय घेण्याची आवशकता आहे.” असं पटेल म्हणाले.

    या पत्रकार परिषदेत पटेल यांनी बांबूचे उत्पादन कसं घ्यायचं याबाबत माहिती दिलीय, तर बांबू पासून निर्मिती होणाऱ्या वस्तूचं महत्त्वदेखील पटवून दिलंय. दुष्काळी मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी बांबूचा पर्याय निवडल्यास नक्कीच शेतकऱ्यांची आर्थिक प्रगती होईल असा विश्वास देखील यावेळी त्यांनी बोलून दाखवलाय. आणि याच अनुषंगाने राज्य सरकारशी चर्चा केली असून, सरकारने देखील यासाठी सकारात्मकता दर्शविली असल्याचं पटेल यांनी यावेळी सांगितल आहे.