बीडच्या आष्टी तालुक्यात वनरक्षकाने गळफास घेऊन केली आत्महत्या…

आष्टी तालुक्यात वनरक्षक म्हणून काम करणाऱ्या, 32 वर्षीय वनरक्षकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आलीय.अनिल आबासाहेब जगताप असं आत्महत्या केलेल्या वनरक्षकाच्या नाव आहे. मानसिक तनावातून जगताप यांनी आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज, आष्टी पोलिसांनी व्यक्त केला आहे.

    बीड : बीडच्या आष्टी तालुक्यात वनरक्षक म्हणून काम करणाऱ्या, 32 वर्षीय वनरक्षकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आलीय.अनिल आबासाहेब जगताप असं आत्महत्या केलेल्या वनरक्षकाच्या नाव आहे.

    अनिल जगताप हे आष्टी तालुक्यातील ब्रह्मगाव कार्यक्षेत्रात वनरक्षक म्हणून कार्यरत होते. मात्र त्यांनी आष्टी परिसरातील शृंगार देवी मंदिराच्या परिसरात असलेल्या, वडाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. दरम्यान मानसिक तनावातून जगताप यांनी आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज, आष्टी पोलिसांनी व्यक्त केला आहे.

    दरम्यान याप्रकरणी आष्टी पोलिस ठाण्यात मृत्यूची आकस्मात नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस कर्मचारी क्षीरसागर करत आहेत.