मला न्याय द्या.. अन्यथा धनंजय मुंडेंच्या दारासमोर आत्मदहन करेल – पीडितेचा संतप्त इशारा

पीडितेला लग्नाचे आमिष दाखवून गावातीलच वाळू माफिया असणाऱ्या आरोपी तरुणाने सतत अत्याचार केला होता. त्यानंतर त्या तरुणाच्या मामाने त्याचं इतर मुलीसोबत लग्न लावलं आणि ते प्रकरण तिथेच मिटवलं. मात्र त्यानंतरही तो तरुण दारू पिल्यानंतर पीडितेच्या रूमवर येऊन अत्याचार करत असे. याच सततच्या त्रासाला कंटाळून पीडितेने आवाज उठवला.

    स्वतःवर सतत झालेल्या शारीरिक अत्याचाराच्या विरोधात आवाज उठवणाऱ्या, अत्याचारग्रस्त नर्सलाचं पोलीसांकडून हिन वागणूक देत अर्वाच्च भाषा वापरल्याचा आरोप, बीडमध्ये पीडितेने केलाय. यामुळे अर्वाच्च भाषा वापरणार्‍या, बीडच्या शिवाजीनगर पोलिस ठाण्यामधील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्याला निलंबित करा आणि मला न्याय द्या. ही मागणी घेऊन पीडित नर्सने, बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर, वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आमरण उपोषण सुरू केलं आहे. जर मला न्याय नाही मिळाला, तर मी जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या घरासमोर आत्मदहन करेल. असा संतप्त आणि टोकाचा इशारा पीडित नर्सने दिला आहे.

    पीडितेला लग्नाचे आमिष दाखवून गावातीलच वाळू माफिया असणाऱ्या आरोपी तरुणाने सतत अत्याचार केला होता. त्यानंतर त्या तरुणाच्या मामाने त्याचं इतर मुलीसोबत लग्न लावलं आणि ते प्रकरण तिथेच मिटवलं. मात्र त्यानंतरही तो तरुण दारू पिल्यानंतर पीडितेच्या रूमवर येऊन अत्याचार करत असे.

    याच सततच्या त्रासाला कंटाळून पीडितेने आवाज उठवला. मात्र तिचा आवाज दाबण्याचा प्रयत्न, बीडच्या शिवाजीनगर पोलिस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी केला. “सहा वर्ष तुला गोड लागलं” मग आता कशाला आली तक्रार देण्यास. असं म्हणत तिला हीन वागणूक देत अर्वाच्च भाषा देखील वापरली. यामुळे पोलीस निरीक्षक ठोंबरे, पीएसआय मीना तुपे आणि कर्मचारी मेखले यांच्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई करावी. अन्यथा वंचित बहुजन आघाडी हे आमरण उपोषण असचं सुरू ठेवेल. असा इशारा वंचितचे जिल्हाध्यक्ष शिवराज बांगर यांनी दिला आहे.

    दरम्यान, “बीड जिल्ह्यात चाललंय तरी काय? कुठं चिमुकलीवर अत्याचार होतोय.. तर कुठं गुंगीचं औषध देऊन बलात्कार.. तर कुठं शरीरसुखाची मागणी घेऊन महिलेला मारहाण.. आणि एवढं होऊनही न्यायाची मागणी घेऊन पोलीस ठाण्यात हीन वागणूक मिळतेय. ही अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे. जे सरकार छत्रपतींचे नाव घेऊन सत्तेवर आलं, त्या सरकारच्या काळातच अशा दुर्दैवी घटना घडत असतील, तर हे खूप वाईट आहे. याची नैतिक जबाबदारी म्हणून सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा.” अशी मागणी देखील वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष शिवराज बांगर यांनी केले आहे.