तिसऱ्या लाटेपूर्वी जीवनावश्यक वस्तू द्या, एकल महिला आक्रमक

तिसरी लाट येणापूर्वी बीड जिल्ह्यातील विधवा, परितक्त्या आणि बेघर असलेल्या एकल महिलांना महिन्याकाठी निदान 5 हजार रुपयांची आर्थिक मदत करावी. मुलांचे शिक्षण मोफत करावे, शिवाय खाद्य पदार्थात सूट द्यावी, अशी मागणी एकल महिला संघटन आणि आरसा फाउंडेशनच्या वतीने  मोर्चा काढून केली.

    बीड : बीडमध्ये विविध मागण्यांसाठी एकल महिला आक्रमक झाले आहेत. एकल महिला संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर आज भव्य मोर्चा काढण्यात आला. गेल्या दीड वर्षांपासून जिल्ह्यात कोरोना महामारी आहे. सरकारकडून अनेक घटकांना मदत मिळाली असली तरी एकल महिलांना अद्याप कसलीच मदत मिळाली नाही. यामुळे हा मोर्चा काढण्यात आला.

    तिसरी लाट येणापूर्वी बीड जिल्ह्यातील विधवा, परितक्त्या आणि बेघर असलेल्या एकल महिलांना महिन्याकाठी निदान 5 हजार रुपयांची आर्थिक मदत करावी. मुलांचे शिक्षण मोफत करावे, शिवाय खाद्य पदार्थात सूट द्यावी, अशी मागणी एकल महिला संघटन आणि आरसा फाउंडेशनच्या वतीने  मोर्चा काढून केली.

    दरम्यान यावेळी “एक रुपयांचा कडीपत्ता, सरकार झालंय बेपत्ता” यासह अनेक घोषणांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दणाणून निघाला होता..