औरंगाबादमध्ये कोरोनाचा हैदोस, २४ तासात सापडले ६४ कोरोनाबाधित रुग्ण

  • औरंगाबाद जिल्ह्यात आतापर्यंत ४८६४ रुग्ण कोरोनावर मात करुन घरी परतले आहे. तर ३५० जणांना कोरोनामुळे आपले प्राण गमवावे लागले आहेत. तरी आजून ३०९७ जण कोरोनाशी संघर्ष करत आहेत. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

बीड – राज्यात कोरोनाचा शिरकाव झाला तेव्हाच लॉकडाऊन केला होता. त्यामुळे कोरोनाला आळा घालण्यात यश मिळाले आहे. कोरोनामुळे उद्भवणाऱ्या भयान परिस्थितीला नियंत्रणात आणण्यात लॉकडाऊनमुळे यश मिळाले आहे. परंतु औरंगाबाद तसेच बीड मध्ये कोरोनाचा प्रकोप दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. कोरोनाचा प्रभाव वाढल्यामुळे १० दिवसांचा लॉकडाऊन राबविण्यात आले आहेत. सर्वत्र जिल्ह्यात संचारबंदी लागू केली आहे. त्यामुळे रुग्णांचे प्रमाण पहिल्यापेक्षा कमी झाले आहे. लॉकडाऊनच्या ३ दिवशी ६४ कोरोनाबाधित सापडले आहेत. 

औरंगाबाद जिल्ह्यात आतापर्यंत ४८६४ रुग्ण कोरोनावर मात करुन घरी परतले आहे. तर ३५० जणांना कोरोनामुळे आपले प्राण गमवावे लागले आहेत. तरी आजून ३०९७ जण कोरोनाशी संघर्ष करत आहेत. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.