बीड जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मान्सून पूर्व पावसाची जोरदार हजेरी…

बीड जिल्ह्यात मान्सून पूर्व पावसाने जोरदार सुरुवात केली आहे. जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये या पावसाने हजेरी लावल्याने, शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झालंय. मात्र आंबा पिकांचं काहीसं नुकसान होण्याची शक्यता आहे.

    बीड : बीड जिल्ह्यात मान्सून पूर्व पावसाने जोरदार सुरुवात केली आहे. जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये या पावसाने हजेरी लावल्याने, शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झालंय. मात्र आंबा पिकांचं काहीसं नुकसान होण्याची शक्यता आहे.

    दरम्यान आज सकाळपासूनच प्रचंड उष्णता आणि अचानक ढग दाटून आले होते. मात्र गेल्या काही तासांपासून बीड जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये जोरदार पाऊस पडत आहे. तसेचं सर्वत्र कोरोनाचं संकट असल्याने, दरवर्षी पावसात बागडणारे बच्चे कंपनी, यंदा मात्र गॅलरीत साचलेल्या पाण्यातचं खेळून आनंद व्यक्त करतांना पाहायला मिळाली.