बीड जिल्ह्यात दमदार पावसाची हजेरी, शेतकऱ्यांनी उरकल्या पेरण्या

  • जिल्ह्यात पावसाने लवकर हजेरी लावल्याने शेतीसाठी पूरक ठरला आहे. यामुळे तूर मूग, उडीद आणि सोयाबीन या पिकाकडे शेतकऱ्यांचा जास्त भर आहे. जिल्ह्यात पाउसाची सरासरी कमी पडत होता. त्यामुळे खरीप पीक जास्त येत नव्हते. यावर्षी आतापर्यंतची पावसाची सरासरी २३६ मिलिमीटर झाले. तरीही शेतीसाठी पावसाच्या आजून गरज भासत आहे.

बीड – बीड जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावल्याने बळीराजा सुखावला आहे. निसर्ग चक्रिवादळामुळे राज्यात मान्सूनचे लवकर आगमन झालेले आहे. त्यामुळे शेतकरी राजा शेतीच्या कामात व्यस्त आहे. बीड जिल्ह्यात पावसाचा दमदार आगमनाने सर्व शेतीविषयक कामांना जोर आला आहे. बळीराजाने पेरणी उरकली आहे. आता सर्व शेतकरी पेरण्या उरकून शेत कुळपणीच्या कामाला लागले आहेत. 

जिल्ह्यात पावसाने लवकर हजेरी लावल्याने शेतीसाठी पूरक ठरला आहे. यामुळे तूर मूग, उडीद आणि सोयाबीन या पिकाकडे शेतकऱ्यांचा जास्त भर आहे. जिल्ह्यात पाउसाची सरासरी कमी पडत होता. त्यामुळे खरीप पीक जास्त येत नव्हते. यावर्षी आतापर्यंतची पावसाची सरासरी २३६ मिलिमीटर झाले. तरीही शेतीसाठी पावसाच्या आजून गरज भासत आहे. 

बीड जिल्ह्यात सोयाबीनच्या देखील पेरण्या शेतकऱ्यांनी उरकल्या आहेत. गेल्यावर्षी सोयाबीनच्या पीक जास्त आले नव्हते अतिवृष्टीमुळे सोयाबीनसह खरीप पीकांचे नुकसान झाले होते. त्यामुळे सोयाबीनच्या उत्पन्नात घट झाला होता. परंतु ह्या वर्षी सोयाबीनचे पीक चांगले येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.