शेतकऱ्यांना तात्काळ मदत करा अन्यथा आमदार-खासदारांना फिरू देणार नाही; शेतकरी कामगार पक्षाचा इशारा

बीड जिल्ह्यात अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पंचनाम्याचे नाटक थांबून सरसकट 50 हजार रुपये हेक्‍टरी तात्काळ मदत द्या मागील वर्षाचा पिक विमा तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करा, अन्यथा आमदार-खासदारांना जिल्ह्यात होऊ देणार नाही असा इशारा शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने देण्यात आला.

    बीड : बीड जिल्ह्यात अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पंचनाम्याचे नाटक थांबून सरसकट 50 हजार रुपये हेक्‍टरी तात्काळ मदत द्या मागील वर्षाचा पिक विमा तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करा, अन्यथा आमदार-खासदारांना जिल्ह्यात होऊ देणार नाही असा इशारा शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने देण्यात आला.

    शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालया समोर अर्धनग्न आंदोलन केले. या वेळी केंद्र आणि राज्य सरकार विरोधात घोषणाबाजी केली. या आंदोलनाचे नेतृत्व शेतकरी नेते भाई मोहन गुंड यांनी केले होते.

    मागील पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शासनाचे अधिकारी पंचनाम्याचे नाटक करत असून पंचनाम्याचे नाटक थांबून शेतकऱ्यांना सरसकट हेक्‍टरी 50 हजार रुपयांची तात्काळ मदत द्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आलीय.

    एफआरपी चे तीन तुकडे न करता उसाची एफआरपी एकरकमी 14 दिवसाच्या आत देण्यात यावी, त्याबरोबरच 2020 मधील पिक विमा तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करा, नदीकाठच्या पूरग्रस्त भागातील गावांचा पुनर्वसन करा यासह विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलं. दरम्यान यावेळी केंद्र सरकार आणि राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आलीय.