टिप्पर आणि बाईकचा भीषण अपघात, तीन जण ठार

  • टिप्पर आणि बाईकचा भीषण अपघात झाल्यामुळे, एकाच कुटुंबातील ३ जण ठार झाल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना काल रात्री १० च्या सुमारास घडली. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस आणि बचावकार्य पथक विनाविलंब घटनास्थळी दाखल झाल्याची माहिती मिळाली आहे.

बीड :  बीडमध्ये वाळू भरलेल्या टिप्पर आणि बाईकचा भीषण अपघात झाल्यामुळे, एकाच कुटुंबातील ३ जण ठार झाल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना काल रात्री १० च्या सुमारास घडली. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस आणि बचावकार्य पथक विनाविलंब घटनास्थळी दाखल झाल्याची माहिती मिळाली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, बीडमध्ये काल रात्रीच्या अंधारात टिप्पर चालकाला समोरून येणारी बाईक न दिसल्यामुळे दुर्दैवीपणे बाईक आणि टिप्परचा मोठा अपघात झाला. परंतु अवैध वाळू तस्करी करणाऱ्या टिप्परच्या धडकेत एकाच कुटुंबातील तीन जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. यामध्ये मृत व्यक्तांची नावे नागनाथ महादेव गायके, वसंत जनार्धन गायके आणि विठ्ठल मुंजाजी गायके अशी आहेत. 

दरम्यान, पोलिसांनी या घटनेची चाचपणी केली असता हे तिन्ही मृतदेह ताब्यात घेतले असून शवविच्छेदनासाठी स्थानिक रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. तर हा अपघात नेमका कसा झाला ? या सर्व गोष्टींचा पुढील तपास पोलीस करत आहेत.