“मी ओबीसी समाजाला दुखावून काहीच करणार नाही”; छत्रपती संभाजीराजेंची ग्वाही

खासदार संभाजी छत्रपती सध्या मराठवाडा दौऱ्यावर आहेत. आज पत्रकार परिषदेमध्ये बोलतांना म्हणाले की, ओबीसी समाजाला दुखावून मी कोणतेही काम करू शकत नाही. जातीविषमता दूर करण्यासाठी माझा हा लढा आहे. कुठल्याही पक्षाच्या विरोधात माझा लढा नाही, अशी ग्वाही देतानाच लोकप्रतिनिधींनी आता मराठा समाजाला वेठीस धरू नये. सगळ्या पुढाऱ्यांनी कायद्याचा अभ्यास करून आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी एकत्र यावे’, असे आवाहन खासदार संभाजी छत्रपती यांनी केले आहे.

  बीड : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाची पुनर्विचार याचिका फेटाळल्यामुळे अनेक वादविवाद सुरु आहेत. ओबीसी आरक्षणाचा प्रश्न सुद्धा आता एका वेगळ्याच वळणावर गेला आहे. ओबीसी आरक्षणाबद्दल अनेक नेत्यांनी आपली मतं व्यक्त केली आहेत.

  दरम्यान या प्रकरणात आता खासदार संभाजी छत्रपती यांनी आपलं मत मांडलं आहे. ते म्हणाले, कि, ओबीसी समाजाला दुखवून मी काहीच करणार नाही’.

  संभाजीराजे काय म्हणाले?

  खासदार संभाजी छत्रपती सध्या मराठवाडा दौऱ्यावर आहेत. आज पत्रकार परिषदेमध्ये बोलतांना म्हणाले की, ओबीसी समाजाला दुखावून मी कोणतेही काम करू शकत नाही. जातीविषमता दूर करण्यासाठी माझा हा लढा आहे. कुठल्याही पक्षाच्या विरोधात माझा लढा नाही, अशी ग्वाही देतानाच लोकप्रतिनिधींनी आता मराठा समाजाला वेठीस धरू नये. सगळ्या पुढाऱ्यांनी कायद्याचा अभ्यास करून आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी एकत्र यावे’, असे आवाहन खासदार संभाजी छत्रपती यांनी केले आहे.

  राजीनामा दिला तर मार्ग निघणार का?

  मराठा आरक्षणासाठी मी राजीनामा दिला तर मार्ग निघणार का? निघत असेल तर मी राजीनामा द्यायला तयार आहे, संभाजी छत्रपतींनी हे विधान केलं आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची मी भेट घेतली. ते मराठा आरक्षणा संदर्भात सकारात्मक आहेत. ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या लढ्यात मी पाठीशी आहे. ओबीसींच्या राजकीय आरक्षण संदर्भात माझा अभ्यास सुरू आहे. मात्र बहुजनांच्या प्रश्नासंदर्भात सदैव त्यांच्या पाठीशी आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.