ओबीसीच्या राजकीय आरक्षणाच्या मुद्यांवर मी पाठपुरावा करणार : पंकजा मुंडे

ओबीसीच्या राजकीय अरक्षणाबाबत राज्य शासन आपली बाजू मांडण्यात अपयशी ठरलं आहे .50 %आरक्षण तर दूरच राहिले आणि होते ते आरक्षण सुद्धा घालवण्याचे काम या सरकारच्या माध्यमातून केले आहे. असा आरोप ही पंकजा मुंडे यांनी केला आहे.

    बीड : सुप्रीम कोर्टाने नुकताच निकाल सुनावला असून या निकालात ओबीसी प्रवर्गाचे राजकीय आरक्षण रद्द करण्यात आले आहे. याचं पार्श्वभूमीवर भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी आपली भूमिका मांडली आहे.

    दरम्यान त्या बोलतांना म्हणल्या की ओबीसीच्या राजकीय अरक्षणाबाबत राज्य शासन आपली बाजू मांडण्यात अपयशी ठरलं आहे .50 %आरक्षण तर दूरच राहिले आणि होते ते आरक्षण सुद्धा घालवण्याचे काम या सरकारच्या माध्यमातून केले आहे. असा आरोप ही पंकजा मुंडे यांनी केला आहे.

    तसेचं पुढे बोलतांना म्हणल्या की, मी या निर्णयाबद्धल तीव्र नापसंती व्यक्त करत आहे आणि मी यावर सक्षम आवाज उठवण्यासाठी स्वतंत्र असल्याचेही त्या म्हणाल्या आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मी नक्कीच भेटेन त्यांना या विषयी बातचीत ही करेन. असं पंकजा मुंडे म्हणाल्या.