बीडमध्ये ४४ नवे कोरोना रूग्ण, २६९ उपचाराधीन

बीडमध्ये कोरोना रूग्णांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होताना दिसत आहे. आज बुधवारी बीडमध्ये आणखी ४४ नवे रूग्ण आढळले असून, २६९ कोरोनाबाधित रूग्ण उपाचाराधीन आहेत. बीड जिल्ह्यात ४४ नवे कोरोनाबाधित पॉझिटिव्ह रूग्ण आढळले असून, मृत्यूची संख्या २० वर पोहोचली आहे. बीडमध्ये ४४ रूग्णांपैकी २३ जण बीड शहरात आढळून आले आहेत. यामध्ये दोघे जण शिरूर, ८ जण गेवराई, ३ जण केज, ५  परळी, १ अंबाजोगाई, १ पाटोदा आणि १ माजलगाव येथील रुग्णांचा समावेश आहे. 

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे बीडच्या जिल्ह्यात मृतांचा आकडा वाढत आहे. त्याचप्रमाणे कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ होऊन, अधिक रूग्ण पॉझिटिव्ह येत आहेत. बीड रूग्णालयात एका ६८ वर्षीय महिलेवर काही दिवसांपासून जिल्हा रूग्णालयात उपाचार सुरू होते. परंतु या महिलेची प्रकृती खालावल्यामुळे आज सकाळी या महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे बीडमधील मृतांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे.