बीड जिल्ह्यात म्युकरमायकोसिस पाठोपाठ ॲस्परजीलॉसिस या नव्या पांढऱ्या बुरशीजन्य आजाराचे आढळले रुग्ण…

बीड जिल्ह्यात स्परजीलॉसिस या नव्या पांढऱ्या बुरशीजन्य आजाराचे दोन रुग्ण आढळून आले आहेत. या रुग्णांवर सध्या अंबाजोगाईतील स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहे. माजलगाव आणि केज तालुक्यातील दोन रुग्णांना हा आजार झाल्याचे उघड झालं आहे. हा आजार म्युकरमायकोसिस एवढा घातक नसल्याचे सांगण्यात येत असले तरी नवा आजार असल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे.

    बीड : बीड जिल्ह्यात कोरोनानंतर म्युकरमायकोसिसने डोके वर काढले. हे असतानाच आता जिल्ह्यात ॲस्परजीलॉसिस या नव्या पांढऱ्या बुरशीजन्य आजाराचे दोन रुग्ण आढळून आले आहेत. या रुग्णांवर सध्या अंबाजोगाईतील स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहे.

    जिल्ह्यात दुसऱ्या लाटेतील रुग्ण कमी होत असतानाच म्युकरमायकोसिस या काळ्या बुरशीजन्य आजाराने डोके वर काढले. आतापर्यंची ही रूग्णसंख्या १५० वर पोचली आहे. तसेच २० जणांचा मृत्यू देखील झालाय. यावर उपाययोजना सुरू असतानाच आता पांढरी बुरशी असलेला अँस्परजीलॉसिस आजार समोर आला आहे.

    दरम्यान माजलगाव आणि केज तालुक्यातील दोन रुग्णांना हा आजार झाल्याचे उघड झालं आहे. हा आजार म्युकरमायकोसिस एवढा घातक नसल्याचे सांगण्यात येत असले तरी नवा आजार असल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे.