बीड मध्ये नदीच्या पुलासाठी ग्रामस्थांचे चक्क नदीच्या काठावरचं आमरण उपोषण…

डच्या गेवराई तालुक्यातील खळेगाव येथील नागरिकांनी, अमृता नदीमध्ये आमरण उपोषण सुरू केल आहे. गेल्या अनेक वर्षापासून खळेगाव ते उमापुर या ठिकाणी जाण्यासाठी पक्का रस्ता नसल्यानं नदीवर पूल बांधून देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

    बीड : बीडच्या गेवराई तालुक्यातील खळेगाव येथील नागरिकांनी, अमृता नदीमध्ये आमरण उपोषण सुरू केल आहे. गेल्या अनेक वर्षापासून खळेगाव ते उमापुर या ठिकाणी जाण्यासाठी पक्का रस्ता नसल्यानं नदीवर पूल बांधून देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

    दरम्यान या नदीला पूर आल्यानंतर अनेकांना पाण्यातून वाट काढावी लागते. तर गेल्या वर्षी या नदीत एका मोटारसायकल स्वराचा व दोन लहान मुलांचा देखील बुडून मृत्यू झाला होता. त्यामुळे आता तात्काळ या नदीवर पूल बांधून देण्याची मागणी, खळेगावच्या ग्रामस्थांनी केली असून या मागणीसाठी आता हे नागरिक चक्क नदीच्या काठावर उपोषणाला बसले आहेत.