गोपीनाथ मुंडेंचे नाव घेऊन, मत मागायला ऊसतोड कामगार मंडळ सुरू केलेले नाही; धनंजय मुंडे यांनी नाव न घेता पंकजा मुंडेंना लगावला टोला

ऊसतोड कामगारांच्या मुलाला शरद पवारांनी मंत्री म्हणून सरकारमध्ये काम करण्याची संधी दिली. त्यामुळे या ऊसतोड मंजुरांच्या कल्याणासाठी ऊसतोड कल्याणकारी महामंडळ सुरू करू शकलो. फक्त दिवंगत गोपीनाथ मुंडेंचे नाव घेऊन मत मागायला ते सुरू केले नाही, असा टोला सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी पकंजा मुंडे यांना नाव न घेता लगावला.

    बीड : एका ऊसतोड कामगारांच्या मुलाला शरद पवारांनी मंत्री म्हणून सरकारमध्ये काम करण्याची संधी दिली. त्यामुळे या ऊसतोड मंजुरांच्या कल्याणासाठी ऊसतोड कल्याणकारी महामंडळ सुरू करू शकलो. फक्त दिवंगत गोपीनाथ मुंडेंचे नाव घेऊन मत मागायला ते सुरू केले नाही, असा टोला सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी पकंजा मुंडे यांना नाव न घेता लगावला.

    बीड जिल्ह्याच्या गेवराई येथे आयोजित कोविड योद्ध्यांच्या सत्कार प्रसंगी ते बोलत होते. राष्ट्रवादीचे सरचिटणीस माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या शारदा प्रतिष्ठाणच्या वतीने या कर्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पुढे बोलतांना धनंजय मुंडे म्हणाले की, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत कुटुंबच्या कुटंब उद्धवस्त झाली. माझ्या परिचयातल्या तर अनेक कुटुंबांमध्ये माणसंच शिल्लक राहीली नाही. सात्वंन करायला जाऊ तर कुणाकडे असा प्रश्न? या कोरोनाने निर्माण केला. निसर्गाच्या विपरित आपण वागलो की तो आपल्यावर कोपतो हे कोरोनाने दाखवून दिले. तिसरी लाट येऊ नये अशीच माझी व आपल्या सगळ्यांची इच्छा असयाला हवी.

    कोरोनाने आपल्या एवढा धडा दिला तरी आपण अजूनही त्याला गांभीर्याने घ्यायला तयार नाही. मला दोनदा कोरोना झाला, व्हॅक्सीन आली, घेतली म्हणून आपण बोंबलत, मास्क न घालता फिरायचं हे कृपया टाळा, तुम्हाला माझी हात जोडून विनंती आहे. व्हॅक्सीन घेतल्यावर देखील मला कोरोना झाला होता, तेव्हा तिसरी लाट येऊ द्यायची नसेल, तर कोरोनाचे नियम पाळा, असे आवाहन देखील मुंडे यांनी यावेळी केले.