कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत बीडमध्ये लहान मुलांना मोठ्या प्रमाणात कोरोनाची लागण…

लहान मुलांमध्ये असलेला कोरोनाचा वाढता आकडा, हा कमी करण्यासाठी प्रशासन प्रयत्न करत आहे. आतापर्यंत या दोन लाटेचा मोठा अनुभव प्रशासनासमोर असून, येणाऱ्या तिसऱ्या लाटेला सामोरं जाण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज आहे.त्याचबरोबर प्रत्येक व्यक्तीला बेड मिळावा, ऑक्सिजन मिळावे, यासाठी प्रशासन तत्पर असणारं आहे. त्याचबरोबर ऑक्सिजन प्लॅन्ट देखील जिल्ह्यात उभा करण्यात आलेले आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी दिली.

    बीड : जिल्ह्यात पहिल्या लाटेत संत गतीने वाढणारा कोरोनाचा आकडा, दुसऱ्या लाटेत झपाट्याने वाढला आहे. हा कोरोनाचा वाढता आकडा प्रशासनाची डोकेदुखी ठरत असतांना, जिल्ह्यात लहान मुलांना देखील या दुसऱ्या लाटेत, मोठ्या प्रमाणावर कोरोनाची लागण होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

    बीड जिल्ह्यात कोरोनाचा आकडा मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. पहिल्या लाटेत जिल्ह्यात एका वर्षात, एकूण 19 हजार 500 जणांना कोरोनाची लागण झाली होती.त्यापैकी 1088 लहान मुलांनचा समावेश आहे. तर दुसऱ्या लाटेत केवळ 1 मार्च ते 15 मे या अडीच महिन्यात तब्बल 61 हजार 421 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी तब्बल 4 हजार 803 लहान मुलांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये 6 महिने ते 14 वर्षाच्या मुलांचा समावेश आहे. तर आतापर्यंत जिल्ह्यात 1 हजार 531 जणांचा मृत्यू झाला आहे.

    घरातील लहान मुलं हे आई वडीलांजवळ येतात. त्यामुळे कुटुंबातील पालकांनी गृह विलगिकरण करणं टाळलं पाहिजे. लहान मुलांना काही लक्षण जाणवली. तर तात्काळ तपासणी केली पाहीजे.असं आवाहन आरोग्य अधिकारी पवार यांनी केलं असून यापुढे आता तिसऱ्या लाटेत हा आकडा वाढू शकतो. यासाठी लहान मुलांसाठी मास्क, व्हेंटिलेटर लागणार आहे. अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी राधकीसन पवार यांनी दिली आहे.

    तर हा वाढणारा कोरोनाचा आकडा रोखण्यासाठी, जिल्ह्यातील प्रत्येक गावात अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, ग्रामसेवक, सरपंच यांच्या माध्यमातून, कोरोना प्रतिबंधक दल स्थापन केलेला आहे.जिल्ह्यात आजही 119 गावांमध्ये कोरोणाचा शिरकाव झालेला नाही. तर गेल्या दोन महिन्यात तब्बल पाच लाख कुटुंबाचं सर्वेक्षण करण्यात आलं आहे. तर लहान मुलांमध्ये असलेला कोरोनाचा वाढता आकडा, हा कमी करण्यासाठी प्रशासन प्रयत्न करत आहे. आतापर्यंत या दोन लाटेचा मोठा अनुभव प्रशासनासमोर असून, येणाऱ्या तिसऱ्या लाटेला सामोरं जाण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज आहे.त्याचबरोबर प्रत्येक व्यक्तीला बेड मिळावा, ऑक्सिजन मिळावे, यासाठी प्रशासन तत्पर असणारं आहे. त्याचबरोबर ऑक्सिजन प्लॅन्ट देखील जिल्ह्यात उभा करण्यात आलेले आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी दिली.

    दरम्यान बीड जिल्ह्यात वाढणारा कोरोनाचा आकडा प्रशासनाची डोकेदुखी ठरत असला तरी, आज गरज आहे ती प्रत्येक कुटुंबातील व्यक्तींना काळजी घेण्याची.आज 6 महिन्यापासून ते 14 वर्षापर्यंत असणाऱ्या लहान मुलांमध्ये, मोठ्या प्रमाणात हा कोरोनाचा शिरकाव झालेला आहे. त्यामुळे ज्या कुटुंबातील व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे, त्यांनी स्वतःहाच आता खबरदारी घेऊन, माझं कुटुंब माझी जबाबदारी ओळखून गृहविलगीकरनात न राहता, संस्थात्मक विलगीकरण करणे महत्त्वाचे आहे. त्याचबरोबर कोरोनाचे लक्षणे जाणवल्यास तात्काळ तपासणी करून घेणं महत्त्वाचं ठरणार आहे.तेव्हाच हा लहान मुलांमध्ये वाढणारा कोरोनाचा आकडा कमी होईल, हे मात्र निश्चित