करुणा मुंडे परळीत दाखल होताच त्यांना पोलिसांनी केलं स्थानबध्द! गाडीत सापडलं पिस्तुल, परळीत तणावाचं वातावरण

परळीत येऊन करुणा शर्मा या वैधनाथाचे दर्शन घेण्यास गाडीतून उतरल्या असताना काही महिलांनी त्यांना घेरण्याचा प्रयत्न केला. तर, काही महिलांनी त्यांना धक्का बुक्की देखील केल्याचे समोर आले आहे. करुणा मुंडे यांना घेरण्यासाठी आलेल्या कार्यकर्त्यींची संख्या जास्त असल्याने पोलीस प्रशासन मात्र हतबल झाल्याचे चित्र यावेळी पाहावयास मिळाले. सध्या करुणा शर्मा यांना परळी शहर पोलिसांनी संरक्षण देऊन पोलीस स्टेशन येथे आणले. यावेळी त्यांच्यासोबत त्यांचा त्यांचा मुलगा आहे.

  बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या पत्नी करुणा शर्मा उर्फ करुणा धनंजय मुंडे या आज सासरी परळीत येऊन वैधनाथाचे दर्शन घेत माध्यमांशी संवाद साधणार होत्या. तसं त्यांनी त्यांच्या फेसबुक अकाउंटवरुन सांगीतलं होतं. सांगीतल्या प्रमाणे त्या परळीत आल्या.

  परळीत धनंजय यांच्या बंगल्या समोर दुपारी बारा वाजता त्या पत्रकार परिषद घेणार होत्या. मात्र, दुपारी दोन वाजता करूणा मुंडे आपल्या मुलासह परळीत दाखल झाल्या. त्या परळीत येताच परंतु पोलिसांनी त्यांना मुलासह ताब्यात घेत स्थानबद्ध केले. याच दरम्यान वैधनाथाचे दर्शन घेण्यासाठी जात असताना परळीतील महिलांनी त्यांची गाडी अडवली व त्यांना धक्काबुक्की केली.

  गाडीत सापडलं पिस्तुल

  करुणा शर्मा यांना ताब्यात घेतल्यावर शहर पोलिसांनी करुणा यांच्या एम एच 04 एच एन 3902 गाडीची पाहणी केली. यावेळी गाडीच्या डिक्कीत एक पिस्तुल सापडलं असून या पिस्तुला परवाना आहे की विना परवाना याची चौकशी पोलीस करत आहेत.

  करुणा शर्मा यांच्या या भेटीत कोणताही अनुचीत प्रकार घडूनये म्हणून आज वौधनाथ परिसरात स्थानिक प्रशासनाच्या वतीने चोख बंदोबस्त लावण्यात आला होता. जागोजागी बॅरीकेट्स देखील लावण्यात आले होते. या सर्व पोलिस बंदोबस्तामुळे मंदिर परिसरात वातावरण तणावाचे वातावरण होते.

  परळीत येऊन करुणा शर्मा या वैधनाथाचे दर्शन घेण्यास गाडीतून उतरल्या असताना काही महिलांनी त्यांना घेरण्याचा प्रयत्न केला. तर, काही महिलांनी त्यांना धक्का बुक्की देखील केल्याचे समोर आले आहे.

  करुणा मुंडे यांना घेरण्यासाठी आलेल्या कार्यकर्त्यींची संख्या जास्त असल्याने पोलीस प्रशासन मात्र हतबल झाल्याचे चित्र यावेळी पाहावयास मिळाले. सध्या करुणा शर्मा यांना परळी शहर पोलिसांनी संरक्षण देऊन पोलीस स्टेशन येथे आणले. यावेळी त्यांच्यासोबत त्यांचा त्यांचा मुलगा आहे.

  दरम्यान, करुणा मुंडे यांनी परळीत जाऊन थेट मंत्री धनंजय मुंडे यांच्या बंगल्यासमोर पत्रकार परिषद घेणार असल्याचं म्हटलं होतं. या पत्रकार परिषदेत त्या त्यांच्या आईचा मृत्यू कसा झाला? सोबतच आणखी अनेक गोष्टींचा खुलासा करणार असल्याचं म्हटलं होतं.