करुणा शर्मा यांना 25 हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर

आज सकाळी 11:30 च्या सुमारास अंबाजोगाई जिल्हा सत्र न्यायालयात करुणा शर्मा यांचे वकील भारजकर यांनी न्यायधिस सापटनेकर यांच्या समोर जामिनासाठी युक्तिवाद केला तर कोर्ट ज्या अटी देणार त्या आम्हाला मान्य आहेत यावर सरकारी वकील अशोक कुलकर्णी यांनी सहमती देत युक्तिवाद संपला आज अखेर करुणा शर्मा यांना जमीन मंजूर झाला आहे.

    बीड : बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात पत्रकार परिषद घेण्यासाठी परळित आलेल्या आणि त्या नंतर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा दाखल झाल्याने सध्या न्यायालयीन कोठडीत असलेल्या करुणा शर्मांच्या जमिनीवरील निर्णय सोमवारपर्यंत पुढे गेला आहे. न्या. सापटनेकर यांच्यासमोर आज दोन्हीबाजूंनी युक्तिवाद झाला असून न्यायालय यावर सोमवारी निर्णय देणार आहे.शर्मा यांना ५ सप्टेंबरला अटक झाली होती.

    करुणा शर्मांनी आपण धनंजय मुंडे यांच्या विरोधात पत्रकार परिषद घेणार असल्याची घोषणा करुन खळबळ उडवून दिली होती. त्यासाठी त्या परळी येथे आल्यानंतर एका महिलेला जातिवाचक शिविगाळ केली आणि प्राणघातक हल्ला केला म्हणून अरुणा शर्मांसह त्यांचा सहकारी अरुण मोरेंवर गुन्हा दाखल झाला होता. परळी पोलिसांनी त्यांना ५ सप्टेंबर रोजी अटक केली होती. तर ६ सप्टेंबर रोजी त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती.

    त्यांनी जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र त्यावरची सुनावणी पुढे ढकलली जात होती. आज न्या. सापटनेकर यांच्यासमोर शर्मा यांच्या जामिनावर सुनावणी झाली. शर्मा यांच्यावतीने अँड. भारजकर यांनी बाजू मांडली तर सरकार पक्षाच्या वतिने सरकारी वकिल अशोक कुलकर्णी यांनी बाजु मांडली. न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकल्यानंतर सोमवारी निर्णय देणार असल्याचे सांगितले. त्यामुळे करुणा शर्मांचा कोठडीतील मुक्काम वाढला होता.

    आज सकाळी 11:30 च्या सुमारास अंबाजोगाई जिल्हा सत्र न्यायालयात करुणा शर्मा यांचे वकील भारजकर यांनी न्यायधिस सापटनेकर यांच्या समोर जामिनासाठी युक्तिवाद केला तर कोर्ट ज्या अटी देणार त्या आम्हाला मान्य आहेत यावर सरकारी वकील अशोक कुलकर्णी यांनी सहमती देत युक्तिवाद संपला आज अखेर करुणा शर्मा यांना जमीन मंजूर झाला आहे.

    न्यायालयीन कोठडीत असलेल्या करुणा शर्मा यांनी अंबाजोगाई अपर जिल्हा व सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र काही कारणास्तव सुनावणी झाली नव्हती. मंगळवारी (दि.21) त्यांच्या जामीन अर्जावर सुनावणी घेण्यात आली. यावेळी न्यायालयाने त्यांना 25 हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे.तर करुणा शर्मा यांचे गाडी चालक मोरे यांनाही जमीन मिळाला आहे.
    करुणा शर्मा नेमकी कोणती भूमिका घेणार याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.