करुणा शर्मा यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी; बीड जिल्हा कारागृहात होणार रवानगी

जातीवाचक शिवीगाळ आणि गाडीत पिस्तूल आढळल्याप्रकरणी करुणा शर्मा यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. तसेच त्यांच्या ड्रायव्हरला एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आंबाजोगाई कोर्टाने ही शिक्षा सुनावली आहे.

    बीड : जातीवाचक शिवीगाळ आणि गाडीत पिस्तूल आढळल्याप्रकरणी करुणा शर्मा यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. तसेच त्यांच्या ड्रायव्हरला एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आंबाजोगाई कोर्टाने ही शिक्षा सुनावली आहे. पोलिसांनी आज करुणा शर्मा यांना कोर्टात दाखल केलं होतं. त्यानंतर दोन्ही बाजूच्या वकिलांनी आपली बाजू मांडली. दोन्हीकडची बाजू ऐकून घेतल्यानंतर कोर्टाने करुणा शर्मांना 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. तर ड्रायव्हरला एक दिवसाची कोठडी सुनावली आहे.

    दरम्यान, कोर्टाने शिक्षा सुनावल्यानंतर शर्मा यांनी जामिनासाठी कोर्टात याचिका दाखल केली आहे. त्यावर कोर्टात सुनावणी सुरू आहे. मी तपासकार्यात सहकार्य करण्यास तयार असून मला जामीन द्यावा, असं शर्मा यांनी कोर्टाला स्पष्ट केलं आहे शर्मा यांच्या गाडीत पिस्तूल आढळून आलं होतं. त्यामुळे शर्मा यांच्या चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

    काल दुपारी शर्मा यांच्या गाडीत पिस्तूल आढळून आली होती. तसेच शर्मा यांच्यावर जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर त्यांना आज कोर्टात हजर करण्यत आलं.