३१ मे पर्यंत बीड मध्ये लॉकडाऊन राहणार; जिल्हाधिकारी रविंंद्र जगताप यांची माहिती…

राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने शासनाने कडक निर्बंध लावले आहे. जिल्हा प्रशासनाने 25 मे पर्यंत सर्व व्यवहार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. यामध्ये आज आणखी वाढ करण्यात आली असून 31 मे पर्यंत सर्व बंद राहणार आहे. यात सर्व औषधालय, दवाखाने, लसीकरण केंद्र, वैद्यकीय विमा कार्यालय, पेट्रोल पंप यांना सुट देण्यात आली आहे.

    बीड :-कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी कडक निर्बंध लावण्यात आलेले आहेत. 25 मे पर्यंत जिल्ह्यात सर्व व्यवहार बंद ठेवण्याचा निर्णय जिल्हाधिकार्‍यांनी घेतलेला होता. यात वाढ करून 31 मे पर्यंत आता व्यवहार बंद राहणार आहे. सकाळी 7 ते 10 या दरम्यान दुध विक्रीस परवानगी राहिल. हातगाड्यावरून सकाळी 7 ते 9 या दरम्यान भाजीपाला विकण्याची परवानगी देण्यात आली असून गॅसवितरणाची दिवसभर मुभा राहिल.

    राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने शासनाने कडक निर्बंध लावले आहे. जिल्हा प्रशासनाने 25 मे पर्यंत सर्व व्यवहार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. यामध्ये आज आणखी वाढ करण्यात आली असून 31 मे पर्यंत सर्व बंद राहणार आहे. यात सर्व औषधालय, दवाखाने, लसीकरण केंद्र, वैद्यकीय विमा कार्यालय, पेट्रोल पंप यांना सुट देण्यात आली आहे. दुधविक्रीसाठी सकाळी 7 ते 10 दरम्यान परवानगी राहिल. भाजीपाला विक्रीसाठी सकाळी 7 ते 9 वाजेपर्यंत परवानगी राहिल. गॅस वितरण दिवसभर करता येईल. बँक, ग्राहक सेवा केेंद्र यांचे कामकाज प्रत्येक दिवशी सकाळी 10 ते दुपारी 1 वाजेपर्यंत केवळ शासकीय व्यवहार, पेट्रोल पंप व गॅस एजन्सी धारकांचे व्यवहार, कृषी संबंधी व्यवहार, वैद्यकीय व्यवहार करता येणार आहे. खते, औषधी, विक्री खरेदीस सकाळी 7 ते दुपारी 1 वाजेपर्यंत परवानगी राहिल.

    तसेचं लसीकरणाकरता 45 वर्षावरील ज्या व्यक्तींना मॅसेज आला आहे. आरोग्य विभागाचे पत्र आले आहे. त्यांनाच लसीकरणाचा डोस घेण्यासाठी जाण्यास मुभा असेल. जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानदार यांनी दि.26-5-2021 पासून सकाळी 7 ते दुपारी 1 या वेळेत लाभार्थ्यांना धान्याचे वाटप करावे. जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या मद्यविक्री पूर्णपणे बंद राहतील असे जिल्हाधिकारी यांनी आदेशात म्हटले आहे. सदरील हे आदेश 31 -5-2021 12 वाजेपर्यंत राहिल