लॉकडाऊनमध्ये बळजबरीने गर्भपात, बलात्कार, विनयभंग; धनंजय मुंडेंच्या बीड जिल्ह्यात सात महिन्यात 638 महिलांवर अत्याचार

मुलगा होत नाही म्हणून बळजबरीने गर्भपात, बलात्कार, कौटुंबिक हिंसाचार, विनयभंग, छेडछाड असे अनेक गुन्हे घडले आहेत. लॉकडाऊन मध्ये या गुन्ह्याचे प्रमाण वाढले आहे. 638 महिला अत्याचाराच्या गुन्ह्यात बलात्काराचे 85 गुन्हे दाखल आहेत. यामुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

  बीड: बीड जिल्ह्यात महिला अत्याचाराच्या घटनेत वाढ झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. मागील सात महिन्यात तब्बल 638 महिला अत्याचारा संदर्भात गुन्हे दाखल झाले आहेत. ही आकडेवारी महिला सुरक्षेचा प्रश्न अधोरेखित करणारी आहे. तसेच वाढत्या घटनांमुळे चिंता देखील व्यक्त केली जात आहे.

  मुलगा होत नाही म्हणून बळजबरीने गर्भपात, बलात्कार, कौटुंबिक हिंसाचार, विनयभंग, छेडछाड असे अनेक गुन्हे घडले आहेत. लॉकडाऊन मध्ये या गुन्ह्याचे प्रमाण वाढले आहे. 638 महिला अत्याचाराच्या गुन्ह्यात बलात्काराचे 85 गुन्हे दाखल आहेत. यामुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

  दरम्यान, महिला वरील गुन्हे कमी करण्यासाठी प्रत्येक पोलीस स्टेशन स्तरावर “पिंक मोबाईल” मोहीम राबवत असून त्यामध्ये सर्वात जास्त महिला अधिकाऱ्याची नेमणूक केली असल्याची माहिती पोलीस अधीक्षक आर राजा यांनी दिलीय.

  बीडमध्ये महिला असुरक्षित, गुन्ह्यांमध्ये दोषी असणाऱ्या कुणालाही सोडला जाणार नाही – धनंजय मुंडे

  महिला अत्याचारा संदर्भात मी स्वतः पोलीस अधीक्षक यांच्यासोबत बैठक घेतली असून महिलांच्या वरील गुन्हा मध्ये दोषी असणाऱ्या कुणालाही सोडला जाणार नाही, त्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल अशा सूचना पोलीस विभागास दिल्या असल्याचं पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले आहे.

  धनंजय मुंडे - पालकमंत्री, बीड