त्या नराधमाचं घृणास्पद कृत्य, विवाहित महिलेचं अपहरण केलं तिला निर्मनुष्य जागी नेलं अन्….

केज तालुक्यातील घाटेवाडी येथील रहिवासी असणारी पीडित महिला शुक्रवारी सायंकाळी शेतातील काम आटोपून आपल्या घरी जात होती. दरम्यान आरोपी फुलचंद गायकवाड त्याठिकाणी आला.

    केज: शेतातील काम उरकून घरी परतणाऱ्या विवाहित महिलेचं अपहरण (Kidnapping) करून तिच्यावर बलात्कार(Rape On Married woman) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपीनं पीडित महिलेचं अपहरण करून तिला आपल्या गाडीत जबरदस्तीनं बसवलं आणि तिला एका निर्मनुष्य ठिकाणी नेलं. याठिकाणी आरोपीनं पीडितेवर जबरदस्ती करत बलात्कार केला. तसेच घटनेची वाच्यता केल्यास नवऱ्याला आणि मुलाला जीवे मारेल, अशी धमकीही दिली.

    याप्रकरणी पीडित महिलेनं फिर्याद दाखल करताच पोलिसांनी आरोपी तरुणाच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्याचबरोबर गुन्ह्यात वापरलेली चारचाकी गाडीही जप्त करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. ही संतापजनक घटना शुक्रवारी सायंकाळी घडली.

    आरोपी व्यक्तीचं नाव फुलचंद गायकवाड असं आहे. केज तालुक्यातील घाटेवाडी येथील रहिवासी असणारी पीडित महिला शुक्रवारी सायंकाळी शेतातील काम आटोपून आपल्या घरी जात होती. दरम्यान आरोपी फुलचंद गायकवाड त्याठिकाणी आला. त्यानं एकट्या महिलेला पाहून तिला जबरदस्तीनं आपल्या चारचाकी गाडीत बसवलं.
    आरोपीनं पीडित विवाहितेचं अपहरण करून तिला शिंदी फाट्यावरील बाळूमामा मंदिरालगत असणाऱ्या एका शेतात नेऊन तिच्यावर बलात्कार केला. महिलेनं आरडाओरडा करण्याच्या प्रयत्न केला. पण निर्मनुष्य ठिकाण असल्यानं तिची हाक कोणीचं ऐकली नाही. बलात्कार केल्यानंतर आरोपीनं पीडितेला घटनेची वाच्यता कुठेही न करण्याची धमकी दिली. तसेच नवरा आणि मुलाला जीवे मारेल, अशी धमकीही दिली.

    दोन दिवसांनी रविवारी पीडित महिलेनं केज पोलीस ठाण्यात जाऊन तिच्यासोबत घडलेला गैरप्रकार पोलिसांना सांगितला. पीडितेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी फुलचंद गायकवाड अटक केली. आरोपी गायकवाडवर पोलिसांनी बलात्कार, अपहरणासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. तसेच गुन्ह्यात वापरलेली चारचाकी गाडी देखील जप्त केली आहे.