बीड मधील मराठा आरक्षण मोर्चा हा भाजपचा अधिकृत मोर्चा : संजय लाखे पाटील

बीड मधील मराठा क्रांती संघर्ष मोर्चा लढा आरक्षणाचा हा भाजपचा अधिकृत मोर्चा आहे हा मराठा समाजाचा मोर्चा नाही या मोर्चाला भाजपची फँडिंग आहे. विनायक मेटे हे भाजपचा मराठा आरक्षण प्रचार सेलचे अधिकृत सदस्य आहेत त्यांनी मराठा समाजाची फसवणूक करू नये, असा आरोप काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते डॉ संजय लाखे पाटील यांनी केला आहे.

    बीड : बीड मधील मराठा क्रांती संघर्ष मोर्चा लढा आरक्षणाचा हा भाजपचा अधिकृत मोर्चा आहे. हा मराठा समाजाचा मोर्चा नाही या मोर्चाला भाजपची फँडिंग आहे. विनायक मेटे हे भाजपचा मराठा आरक्षण प्रचार सेलचे अधिकृत सदस्य आहेत त्यांनी मराठा समाजाची फसवणूक करू नये, असा आरोप काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते डॉ संजय लाखे पाटील यांनी केला आहे. ते बीड मधील पत्रकार परिषद बोलत होते.

    दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की मराठा समाजाचे जे प्रश्न असतील त्यासाठी आम्ही सोबत आहोत मराठा समाज स्वतःहून रस्त्यावर उतरला तर त्यांच्या खांद्याला खांदा लावून आम्ही त्यांच्यासोबत रस्त्यावर उतरु आणि त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करू आम्ही धास्ती घेतली आहे ती सहा तारखेच्या रायगडावरील कार्यक्रमाची आमचे श्रद्धास्थान आहे त्या श्रद्धास्थानाला काही गालबोट लागू नये, असामाजिक संघाने त्यांना परत सत्तेत यायचे आहे, अशा लोकांनी काही गोंधळ घालू नये म्हणून त्यापूर्वी वस्तुस्थिती सांगण्यासाठी राज्यांमध्ये दौरे करत आहोत मेटेंचा मोर्चा राजकीय त्याला राजकीय उत्तर देऊ, आम्हाला भीती हि रायगडाची आहे राजकीय पक्षाच्या धमकीला मी भीक घालत नाहीत. असं लाखे पाटील म्हणाले.

    तसेचं संभाजीराजेंच्या मराठा आरक्षणासंदर्भातील भूमिके सोबत आम्ही आहोत, संभाजीराजेंनी उपस्थित केलेले मराठा समाजाच्या संदर्भातील सर्व प्रश्न सहा तारखेच्या अगोदर सोडविण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. राज्य सरकारच्या प्रश्नावर राज्य सरकारने सोडवले पाहिजे आणि केंद्र सरकारचे प्रश्न केंद्र सरकारने सोडवले पाहिजे तू तू मै मै करू नये व मराठा समाजावर अन्याय करू नये, अशी मागणी संभाजी राजेंची आहे आणि संभाजीराजे म्हणत आहेत दिल्लीला जाऊन आपण हा प्रश्न सोडवू भारतीय जनता पक्षाच्या सर्व नेत्यांना माझे आवाहन आहे की त्यांनी मराठवाडयात फिरण्यापेक्षा दिल्लीमध्ये जाऊन मराठा समाजाचा प्रश्न सोडवावा, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते डॉ. संजय लाखे पाटील यांनी केली.