रेल्वे मध्ये विद्यार्थिनीची छेड काढत विनयभंग; मुंबईतील एनसीबीच्या अधिकाऱ्याला अटक

हैदराबाद - हडपसर रेल्वे गाडी मध्ये रात्री विद्यार्थिनी चा छेड काढत विनयभंग केल्याची घटना.उदगीर -लातूर दरम्यान घडली विद्यार्थिनीच्या तक्रारीवरून मुंबई येथील एनसीबीचा अधीक्षक असलेल्या दिनेश अंकुश चव्हाण या अधिकाऱ्याला अटक करण्यात आली आहे.

    बीड : हैदराबाद – हडपसर रेल्वे गाडी मध्ये रात्री विद्यार्थिनी चा छेड काढत विनयभंग केल्याची घटना.उदगीर -लातूर दरम्यान घडली विद्यार्थिनीच्या तक्रारीवरून मुंबई येथील एनसीबीचा अधीक्षक असलेल्या दिनेश अंकुश चव्हाण या अधिकाऱ्याला अटक करण्यात आली आहे. त्याला परळी रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेतले असून या प्रकरणी आरोपीविरुद्ध परळी येथील जीआरपी पोलिस ठाण्यात भादंवि कलम ३५४, ५०९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    गुरुवारी रात्री हैदराबाद- हडपसर या रेल्वेने एनसीबीचा  एक अधिकारी व एक विद्यार्थिनी प्रवास करीत असताना त्या अधिकाऱ्याने विद्यार्थिनीची छेड काढली. त्यानुसार विद्यार्थिनीने रेल्वे पोलिसाकडे तक्रार दाखल केली आहे. त्यावरून आरोपीस परळी रेल्वेच्या जीआरपी पोलिसांनी ताब्यात घेतले. हा प्रकार लातूर रोड दरम्यान घडला आहे. आज अटक करण्यात आलेल्या दिनेश चव्हाण यांना न्यायालयात हजर करण्यात येईल.