परळीत आयोजित कार्यक्रमात मुंडे बहीण भाऊ एका मंचावर; प्रीतम मुंडेंचा नाव न घेता धनंजय मुंडेंना टोला

बीड जिल्ह्याच्या परळी येथील आयोजित विठ्ठल रुक्मिणी मंदिर जिर्णोद्धार कार्यक्रमात राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे तर बीड जिल्ह्याच्या खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांनी एकाच मंचावर उपस्थिती लावली. याप्रसंगी बोलतांना प्रीतम मुंडे म्हणाल्या की, परळीत सुरू असलेल्या विकास कामाच्या नावाखाली सुरू असलेल्या रस्त्याच्या कामामुळे अनेक खड्डे पडले असल्यामुळे मला आज या कार्यकर्मात येण्यास वेळ लागला असं नाव न घेता धनंजय मुंडे यांना टोला लगावला.

    बीड : बीड जिल्ह्याच्या परळी येथील आयोजित विठ्ठल रुक्मिणी मंदिर जिर्णोद्धार कार्यक्रमात राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे तर बीड जिल्ह्याच्या खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांनी एकाच मंचावर उपस्थिती लावली. याप्रसंगी बोलतांना प्रीतम मुंडे म्हणाल्या की, परळीत सुरू असलेल्या विकास कामाच्या नावाखाली सुरू असलेल्या रस्त्याच्या कामामुळे अनेक खड्डे पडले असल्यामुळे मला आज या कार्यकर्मात येण्यास वेळ लागला असं नाव न घेता धनंजय मुंडे यांना टोला लगावला.

    तर यावर धनंजय मुंडे म्हणले की, मी पाहिलेलं स्वप्न आणि तुम्ही पाहिलेलं परळीचा विकासाच स्वप्न लवकरच साकार होणार मात्र यासाठी मुळात पाया पक्का करावा लागतो आणि हा पाया पक्का करण्यासाठी वेळ लागतो आहे. परळीत सुरू असलेले रस्त्याचे काम आधी पक्के करत असल्याचे धनंजय मुंडे यांनी प्रीतम मुंडे यांना प्रत्यूत्तर देत टोला लगावला.

    तसेचं धनंजय मुंडे पुढे बोलतांना म्हणाले की, यामुळे मी आपल्या परळीच्या विकास कामाचा पाया पक्का करण्यासाठी वेळ लागत आहे. म्हणून प्रीतम मुंडे यांना या ठीकाणी येण्यास वेळ लागला असावा, अस मला वाटते. असं म्हणाले.