बीडमध्ये मुंडे समर्थक आक्रमक, 11 तालुकाध्यक्षांनी दिले राजीनामे, एकाच दिवसात 25 जणांचे राजीनामे

    बीड : बीडच्या खासदार प्रीतम मुंडे यांना मंत्रिमंडळातून डावलण्यात आल्यामुळे मुंडे समर्थकांमध्ये कमालीची नाराजी पसरली आहे. पदाधिकारी आणि भाजप कार्यकर्त्यांचे राजीनामे सत्र सुरूच आहे. एकाच दिवसात 25 जणांनी राजीनामे दिले आहे. त्यामुळे बीडमध्ये भाजपच्या गोटात खळबळ उडाली आहे.

    खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांना मंत्रिपदावरून डावलल्यामुळे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. भाजप कार्यकर्ते नाराजी सत्र सुरूच जिल्ह्यातील 11 तालुका अध्यक्षांनी राजीनामे दिले आहे. भाजपाचे जिल्हा अध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्याकडे सुपूर्द सर्व तालुकाध्यक्षांनी आपले राजीनामे सादर केले आहे.