बीड नगरपरिषदेत राष्ट्रवादी शिवसेना वाद पेटला; पुरावे सादर करून नगराध्यक्षांनी विरोधकांची केली पोलखोल

बीडच्या नगर परिषदेवर शिवसेनेचे वर्चस्व आहे तर बीडचे आमदार त्यांचेच पुतणे संदीप क्षीरसागर आहेत. त्यांना सपोर्टर म्हणून बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे हे बीड नगरपालिकेच्या विकास कामात अडथळा अनंत असून, अनेक विकासाची कामे रोखून धरली असल्याचा आरोप बीड नगर परिषदेच्या नगर अध्यक्ष डॉ भरतभूषण क्षीरसागर करत आहेत.

    बीड : बीड नगर पालिका जयदत्त अण्णा क्षीरसागर यांचे भाऊ डॉ भारतभूषण क्षीरसागर यांच्या ताब्यात आहे. ते या नगर पालिकेचे नगराध्यक्ष आहेत मात्र बीड चे आमदार त्यांचे पुतणे संदीप क्षीरसागर आहेत तर बीड जिल्ह्याचे पालकमंत्री हे धनंजय मुंडे आहेत. मात्र महाविकास आघाडी सरकारच्या काळात सेना राष्ट्रवादी व काँग्रेस पक्षाचे हे सरकार राज्यात सत्तेत आहे. आणि अश्या परिस्थितीत काका जयदत्त अण्णा क्षीरसागर हे शिवसेनेचे असून पुतण्या आमदार संदीप क्षीरसागर हे राष्ट्रवादी पक्षाचे आहेत. एकाच घरात विभाजन होऊन काका विरोधात पुतण्या असा वाद सुरू असताना महाविकास आघाडी सरकारने गट बंधन झाले आणि सेने व राष्ट्रवादी एकत्र आले. मात्र बीड च्या नगर परिषदेवर शिवसेनेचे वर्चस्व आहे तर बीड चे आमदार त्यांचेच पुतणे संदीप क्षीरसागर आहेत. त्यांना सपोर्टर म्हणून बीड चे पालकमंत्री धनंजय मुंडे हे बीड नगर पालिकेच्या विकास कामात अडथळा आणत असून, अनेक विकासाची कामे रोखून धरली असल्याचा आरोप बीड नगर परिषदेच्या नगर अध्यक्ष डॉ भरतभूषण क्षीरसागर करत आहेत.

    दरम्यान ते बीड येथे आयोजित पत्रकार परिषदेत पत्रकारांना बोलतांना म्हणले की, आगामी काळात बीड नगर पालिका ही आमदार संदीप क्षीरसागर यांच्या ताब्यात येण्यासाठी हा डाव असून ही सर्व खेळी पालकमंत्री धनंजय मुंडे करत असल्याचा आरोप ही केला आहे.

    नगर अध्यक्ष यांनी स्पष्टीकरण देत म्हणले की, विकासाची नवी संकल्पना घेऊन या पाच वर्षांच्या काळात केवळ बीडच्या जनतेला दिलेले वचन पूर्ण करण्यासाठी शासन दरबारी सातत्याने प्रयत्न करून मोठा निधी उपलब्ध करून घेतला, अण्णांच्या माध्यमातून अमृत अटल आणि भुयारी गटार योजना मंजूर करून त्याचेही काम सुरू केले, झालेल्या कामानंतर नागरिकांना येणार्‍या अडचणी सोडवण्यासाठी विविध योजनेतून निधी मंजूर करून घेतला मात्र सुडाचे राजकारण करणार्‍या स्थानिक आमदारांनी पालकमंत्री यांच्या कडून नगर पालिकेच्या संविधानिक हक्क हिसकावून घेत बीड शहरात होणारी विविध विकास कामे अडवली आहेत,ही बाब आता जनतेने लक्ष्यात घेऊन जाब विचारायला हवा असे परखड मत नगराध्यक्ष डॉ भारतभूषण क्षीरसागर यांनी आज पत्रकार परिषेदेत पुराव्यानिशी मांडले आहेत.