आता मूक नाही तर ठोक मोर्चा; मराठा समाजाचा इशारा

सर्वच संघटना एकत्र आल्या असून आतापर्यंत शांततेत मूक मोर्चा काढून पदरी निराशाच आलीय. त्यामुळे मोर्चा नाही तर रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला गेलाय.

    बीड : बीड मध्ये आरक्षणाच्या मागणी वरून मराठा समाज आक्रमक झालाय. सर्वोच्च न्यायालयात आरक्षण रद्द झाल्यानं पुढील भूमिका ठरवण्यासाठी आज मराठा समन्वयकांनी बैठक घेतली आहे. या बैठकी मध्ये आता मूक नाही तर ठोक मोर्चाचा इशारा देण्यात आलाय.

    दरम्यान घटना दुरुस्ती करून मराठा समाजाला आरक्षण द्या, यासाठी आग्रही भूमिका घेण्यात आलीय. दरम्यान यावेळी सर्वच संघटना एकत्र आल्या असून आतापर्यंत शांततेत मूक मोर्चा काढून पदरी निराशाच आलीय. त्यामुळे मोर्चा नाही तर रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला गेलाय. तर मराठा समाजाच्या आमदार आणि खासदारांना रस्त्यावर फिरू न देण्याच यावेळी सांगितले गेलंय.