बैठका नको, स्पेशल फोर्स द्या : पंकजा मुंडे यांची मागणी
बैठका नको, स्पेशल फोर्स द्या : पंकजा मुंडे यांची मागणी

बीडमध्ये तरुणीवर ॲसिड हल्ला होऊन नंतर जिवंत जाळण्याची घटना समोर आली आहे. उपचारादरम्यान त्या तरुणीचा मृत्यू झाला. या घटनेवर भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी संताप व्यक्त केला आहे. गृहमंत्र्यांनी यात तात्काळ लक्ष घातले पाहिजे अशी मागणी पंकजा मुंडे यांनी केली आहे.

नवराष्ट्र न्यूज नेटवर्क, बीड.

बीडमध्ये तरुणीवर ॲसिड हल्ला होऊन नंतर जिवंत जाळण्याची घटना समोर आली आहे. उपचारादरम्यान त्या तरुणीचा मृत्यू झाला. या घटनेवर भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी संताप व्यक्त केला आहे. गृहमंत्र्यांनी यात तात्काळ लक्ष घातले पाहिजे अशी मागणी पंकजा मुंडे यांनी केली आहे. या घटनेप्रकरणी बैठकात वेळ न घालविता स्पेशल फोर्स प्रत्येक जिल्ह्यात स्थापन करावा अशी मागणीही त्यांनी केली.

फास्ट ट्रॅक कोर्टात व्हावी सुनावणी

महाराष्ट्राला या घटना नवीन नाहीत. मुख्यमंत्री, गृहमंत्री यांनी यामध्ये लक्ष घातले पाहिजे. फक्त बैठका न घेता माहिती घेऊन एक स्पेशल फोर्स प्रत्येक जिल्ह्यात विशिष्ट घटना हाताळण्यासाठी लावला पाहिजे. खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपीला कठोर शिक्षा दिली जावी असे पंकजा म्हणाल्या.

गृहमंत्र्यांसोबत करणार चर्चा

दिवाळीच्या दिवशी असं काही बोलावं लागणं दुर्देवी असल्याचं त्यांनी म्हटले आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि बीडच्या पोलीस महासंचालकांशी बोलणार असल्याचेही त्यांनी सांगितले. उल्लेखनीय असे की, दिवाळासाठी गावी परतणाऱ्या तरुणीवर येळंबघाट इथे घटना घडली होती. गंभीररीत्या भाजलेल्या तरुणीवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असतानाच रविवारी पहाटे तिचा मृत्यू झाला होता. याप्रकरणातील आरोपी आणि मृत तरुणी पुण्यात लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होती, अशी माहिती समोर आली आहे.