‘या’ जिल्ह्यात जुन्या भांडणाच्या रागातून एकावर दिवसाढवळ्या गोळीबार

जुन्या भांडणाच्या कारणावरून एका तरुणावर दिवसा गोळीबार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पवन गावडे यांच्या फिर्यादीवरून संजय पवार आणि अविनाश पवार या दोघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे

    बीड: मागील काही काळापासून राज्यात गुन्हेगारीच्या प्रमाणात प्रचंड वाढ होताना दिसत आहे. बीड जिल्ह्यातील (Beed District) मादळमोही गावात (Madalmohi Village) हा प्रकार घडला आहे. जुन्या भांडणाच्या कारणावरून एका तरुणावर दिवसा गोळीबार (Firing in daylight) केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. नशीब दैव बलवत्तर आणि वेळीच सतर्कता दाखविल्याने गोळीबारात तरुणाचे प्राण वाचले आहेत. ही संपूर्ण घटना घटनास्थळी लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीत कैद झाली असून तो व्हिडीओ आता सोशल मीडियात व्हायरल झाला आहे.

    काल सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली असून त्याचा व्हिडीओ आज सकाळी समोर आला आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियात जोरदार व्हायरल होत आहे. तसेच बीडमध्ये कायद्याचे भय आहे की नाही हा प्रश्न निर्माण केला जात आहे. याप्रकरणी दोघांविरोधात गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.जुन्या भांडणाच्या कारणावरून एका तरुणावर दिवसा गोळीबार (Firing in daylight) केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पवन गावडे यांच्या फिर्यादीवरून संजय पवार आणि अविनाश पवार या दोघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

    मादळमोही येथील पवन गावडे या तरुणाचे महामार्गालगत घर आणि येथेच बांधकाम साहित्याचे दुकान आहे. काल सायंकाळच्या सुमारास दुकानासमोर पवन गावडे हे थांबले असता याठिकाणी दोन तरुण मोटारसायकलवरुन आले. यानंतर जुन्या भांडणातून दाखल असलेला गुन्हा परत घे म्हणून गावडे यांच्याशी हुज्जत घालत त्यांच्या डोक्याला एका जणांनी पिस्तूल लावून गोळी झाडली.

    यावेळी गावडे यांनी सतर्कता दाखविल्याने गोळी डोक्याला चाटून गेली. हा सर्व थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.