बीडमध्ये ३५ कोरोनाबाधितांच्या जीवाशी खेळणारा ऑक्सिजन चोरटा चार दिवसानंतरही मोकाटच, ऑक्सिजन पुरवठा करणारा पाईप तोडण्याचा केला होता प्रयत्न

यापूर्वी एका दारूड्याने ऑक्सिजन पुरवठा बंद केला होता. तेव्हा जिल्हा शल्य चिकित्सक म्हणून डॉ.सूर्यकांत गित्ते कर्तव्यावर होते. तेव्हाही काहीच कारवाई झालेली नव्हती. आता त्यापेक्षाही गंभीर प्रकार घडला. चोरटाही सापडला. परंतू चार दिवस उलटूनही जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुरेश साबळे व त्यांच्या पथकाने कसलीच कारवाई केली नाही.

    बीड जिल्हा रूग्णालयात ऑक्सिजन पुरवठा करणारा तांब्याचा पाईप तोडण्याचा प्रयत्न करणारा चोरटा बिनधास्त फिरत असल्याचे समोर आले आहे. ऑक्सिजन बंद करून ३५ रूग्णांच्या जीवाशी खेळूनही आरोग्य विभागाने या चोरट्याविरोधात सोमवारी दुपारी ४ वाजेपर्यंत पोलीस ठाण्यात तक्रार दिलेली नव्हती. त्यामुळे आता जिल्हा शल्य चिकित्सक व अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याच कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे. यामुळे सामान्यांमध्ये भितीचे वातावरण आहे.

    जिल्हा रूग्णालयातील वॉर्ड क्रमांक ७, ८ व ९ मध्ये ऑक्सिजन पुरवठा करणारा तांब्याचा पाईप तोडून चोरण्याचा प्रयत्न एका दारूड्याने केला होता. वेळीच हा प्रकार निदर्शनास आल्याने चोरट्याला पकडण्यात आले. शिवाय या तीन वॉर्डमधील ऑक्सिजनवर असणारे ३५ रूग्णांचा जीवही सुरक्षित राहिला. या चोरट्याविरोधात कडक कारवाई होणे अपेक्षित होते. परंतू चार दिवस उलटूनही सोमवारी दुपारी ४ वाजेपर्यंत बीड शहर पोलीस ठाण्यात कसलीच नोंद झालेली नव्हती.

    दरम्यान, यापूर्वी एका दारूड्याने ऑक्सिजन पुरवठा बंद केला होता. तेव्हा जिल्हा शल्य चिकित्सक म्हणून डॉ.सूर्यकांत गित्ते कर्तव्यावर होते. तेव्हाही काहीच कारवाई झालेली नव्हती. आता त्यापेक्षाही गंभीर प्रकार घडला. चोरटाही सापडला. परंतू चार दिवस उलटूनही जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुरेश साबळे व त्यांच्या पथकाने कसलीच कारवाई केली नाही.