परळीत पूरग्रस्तांसाठी पंकजा मुंडेंची मदतफेरी

“परळीकरांनी नेहमी मला भरभरून दिलं. आजही त्यांनी भरभरून मदत केली. एकीकडं राजकारणात जातीयतेचा रंग असताना, दुसरीकडे पूरग्रस्तांच्या मदतीसाठी जातीपाती विसरून, जातीपाती धर्माच्या पलीकडे नागरिकांनी मदतीसाठी हात पुढे केले आहेत. प्रत्येकांनी तिथं जाउन फोटो काढून बाईट देण्यापेक्षा अशी मदत करावी.” असा सल्ला देखील त्यांनी दिला आहे.

    पश्चिम महाराष्ट्रासह कोकणात निर्माण झालेल्या पूर परिस्थितीमुळे, हजारो कुटुंबं उद्ध्वस्त झाली. शेकडो जणांना आपला जीव गमवावा लागला. यामुळं तिथल्या नागरिकांना अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे. यामुळं पूरग्रस्त नागरिकांच्या मदतीसाठी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी, आज परळीत मदतफेरी काढली. यावेळी पंकजा मुंडे यांनी परळीकरांना मदतीचे आवाहन देखील केलं आहे.

    यावेळी पंकजा मुंडे म्हणाल्या की, “परळीकरांनी नेहमी मला भरभरून दिलं. आजही त्यांनी भरभरून मदत केली. एकीकडं राजकारणात जातीयतेचा रंग असताना, दुसरीकडे पूरग्रस्तांच्या मदतीसाठी जातीपाती विसरून, जातीपाती धर्माच्या पलीकडे नागरिकांनी मदतीसाठी हात पुढे केले आहेत. प्रत्येकांनी तिथं जाउन फोटो काढून बाईट देण्यापेक्षा अशी मदत करावी.” असा सल्ला देखील त्यांनी दिला आहे.

    पुरग्रस्थांच्या मदतीसाठी त्यांनी स्वतः मदत फेरीस सुरुवात केली. जवळपास 6 बॉक्स मध्ये मदतीच्या स्वरूपाने दिलेले पैसे, जिवनावशक मदत गरजुंपर्यंत पोहोचणार असल्याचे आश्वासन यावेळी पंकजा मुंडे यांनी दिले.

    जेवढे पैसे मदतीच्या रूपाने येतील त्याच्या बरोबरीने गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने पुरग्रस्तांना देणार असल्याचेही पंकजा मुंडे माध्यमांशी बोलतांना सांगीतलं. परळीच्या व्यापारी वर्गातून पुरग्रस्थांच्या मदतीसाठी चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे.