मी शर्यतीत असेन आणि तोडणाऱ्यांना उत्तर देईन, पंकजा मुंडेंचा इशारा

बीड (Beed) माझी जन्मभूमी आणि कर्मभूमी आहे. मी जिथे आहे तिथेच आहे. मी शर्यतीत असेन आणि तोडणाऱ्यांना उत्तर देईन, असं म्हणत भाजपा नेत्या पंकजा मुंडेंनी (pankaja munde) राजकीय विरोधकांना इशारा दिला आहे. आजही माझ्याकडे कुठलंच पद नाही. संपत्ती कमी झाली तरी चालेल पण माझ्या दारातली गर्दी कधी कमी होऊ देऊ नको, अशीच मी प्रार्थना करते. असं पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत.

बीडः बीड (Beed) माझी जन्मभूमी आणि कर्मभूमी आहे. मी जिथे आहे तिथेच आहे. मी शर्यतीत असेन आणि तोडणाऱ्यांना उत्तर देईन, असं म्हणत भाजपा नेत्या पंकजा मुंडेंनी (pankaja munde) राजकीय विरोधकांना इशारा दिला आहे. आजही माझ्याकडे कुठलंच पद नाही. संपत्ती कमी झाली तरी चालेल पण माझ्या दारातली गर्दी कधी कमी होऊ देऊ नको, अशीच मी प्रार्थना करते. असं पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत.

आपल्याला कुणीच हात लावू शकत नाही. बजेट कसं घ्यायचं आणि काम कसं करायचं हे मी जाणते. बीड माझी जन्मभूमी आणि कर्मभूमी आहे. मी जिथे आहे तिथेच आहे. मी शर्यतीत असेन आणि तोडणाऱ्यांना उत्तर देईन, असंही पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत. मुंडेंच्या विचारांची जबाबदारी माझ्यावर आहे. मला तुमच्या कर्जात राहायला आवडेल, असंही उपस्थितांना संबोधून त्या म्हणाल्या आहेत.

ऊसतोड कामगारांसाठीच ( sugercane worker) माझा कारखानाही मी उशिरा सुरू केला. कारण माझ्या कामगारांचा संप सुरू आहे. बोलणाऱ्याला काय होतं, जा तुम्ही संप करा सांगतात. मुंबईत बसून निर्णय होत नाहीत. ऊसतोड कामगारांचा प्रतिनिधी लवादात नको. असं ऊसतोड कामगारांच्या संघटनाच सांगत आहेत. कारखानदार ऊसतोड कामगारांचा नेता होऊ शकतो. ऊसतोड कामगारांचा नेता पक्षाचा नसतो, असंही पंकजा मुंडेंनी सांगितलं आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे माझे भाऊच आहेत, त्यांनी प्रेमानं विचारलं किती आदळआपट करशील, तर मी म्हणाले ऊसतोड कामगारांसाठी आदळआपट करावीच लागेल. ठाकरे सरकारनं शेतकऱ्यांना दिलेल्या १० हजार कोटींचं पंकजा मुंडेंनी स्वागत केले आहे. शेतकऱ्यांना भरघोस मदतीची गरज असल्याचंही त्यांनी सांगितलं.