Rebellion in graduate elections; Pankaja Munde supporters also filed nomination papers

भाजपा नेत्या तसेच माजी मंत्री पंकजा मुंडे यांचे नीकवटर्तीय समजले जाणारे केशव आंधळे यांनी आज जिल्हा बँक संदर्भात राष्ट्रवादीच्या बैठकीला हजेरी लावल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. मुंडे यांना हा मोठा धक्का मानला जात आहे.

    बीड : शिवसेनेने जळगाव महापालिकेत भाजपाच्या गडाला भगदाड पाडले असतानाच आता मराठवाड्यातही भाजपाला जबर धक्का बसण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. भाजपा नेत्या तसेच माजी मंत्री पंकजा मुंडे यांचे नीकवटर्तीय समजले जाणारे केशव आंधळे यांनी आज जिल्हा बँक संदर्भात राष्ट्रवादीच्या बैठकीला हजेरी लावल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. मुंडे यांना हा मोठा धक्का मानला जात आहे.

    भाजपाच्या ताब्यात असणाऱ्या बीड जिल्हा बँकेच्या निवडणुकीत अगोदरच बँकेच्या अध्यक्षांनीच उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. अध्यक्षांनीच उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने भाजपची पीछेहाट झाल्याचे उघड झाले होते. त्यानंतर लगेच माजी आमदार असणारे आंधळे थेट राष्ट्रवादीच्या गोटात सामील होताच मोठी खळबळ उडाली आहे.

    विशेष म्हणजे या बैठकीमध्ये आंधळे यांनी तीन मिनिटाचे भाषण सुद्धा ठोकले. या बैठकीला सामाजिक न्यायमंत्री तथा पालकमंत्री धनंजय मुंडे, आमदार संदीप क्षीरसागर, माजी आमदार अमरसिंह पंडीत, माजी मंत्री आ प्रकाश सोळुंके, आ. बाळासाहेब आजबे यांची उपस्थिती होती. त्यामुळे लवकरच आंधळे हे राष्ट्रवादीचे घड्याळ हातात बांधू शकतात, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

    जिल्हा बँकेच्या निवडणुकीत देखील पीछेहाट होत असल्याने भाजपची व बीडमधील पंकजा मुंडे यांची ताकद कमी करण्याचा प्रयत्न होत असल्याची राजकीय गोटात चर्चा आहे. विधानसभा निवडणुकीच्या पराभवानंतर भाजपाच्या ताब्यातील जिल्हा परिषद राष्ट्रवादीच्या ताब्यात गेली. त्यानंतर ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये देखील भाजपाला म्हणावे तसे यश मिळाले नाही.