पंकजा मुंडे यांची सावरगांवला भेट; संत भगवान बाबांच्या दर्शनासह दसरा मेळावा मैदानाचीही केली पाहणी

पंकजा मुंडे संत भगवान बाबांचे जन्मस्थान असलेल्या सावरगाव घाट येथे आल्या होत्या. गावात आल्यानंतर सर्वप्रथम त्यांनी संत भगवान बाबांचे दर्शन घेतले. याठिकाणी उभारलेल्या स्मारकाला भेट देत मुर्तीचे दर्शन करून मेळावा मैदानाची पाहणी केलीय.

    बीड : लोकनेते गोपीनाथ मुंडे यांनी सुरू केलेली दसरा मेळाव्याची परंपरा आपल्या सगळ्यांना जपायची आहे. श्वासात श्वास असेपर्यंत दसऱ्याला भगवान भक्तीगडावर नतमस्तक होण्यासाठी मी येणार आहे, तुम्हीही येणार ना..? अशी साद भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी संत भगवान बाबांच्या जन्मस्थळी घातलीय.

    पंकजा मुंडे संत भगवान बाबांचे जन्मस्थान असलेल्या सावरगाव घाट येथे आल्या होत्या. गावात आल्यानंतर सर्वप्रथम त्यांनी संत भगवान बाबांचे दर्शन घेतले. याठिकाणी उभारलेल्या स्मारकाला भेट देत मुर्तीचे दर्शन करून मेळावा मैदानाची पाहणी केलीय.

    भक्ती आणि शक्तीचा संगम दरवर्षी इथे होत असतो. लोकनेते मुंडे साहेबांनी सुरू केलेली ही परंपरा आपणा सर्वांना जपायची आहे. जो कधी झुकत नाही, थकत नाही आणि रूकत नाही असा वारसा तुमच्यामुळे मला मिळाला, तुमच्या जीवावरच मी लढू शकते, संघर्ष करू शकते. दरवर्षी दसरा मेळाव्याला देशभरातून एका रात्रीत लाखो लोक जमा होतात, मागील वर्षी कोरोना मुळे ऑनलाईन मेळावा घेतला. ही परपंरा अखंड ठेवण्यासाठी यंदा मी नतमस्तक होण्यासाठी येणार असल्याचं पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत.