मोकाट फिरणाऱ्यांना परळी पोलिसांकडून दंडुक्याचा चोप…

    बीड : बीड जिल्ह्यात सध्या कडक लॉकडाऊन सुरू असून अत्यावश्यक सेवेसाठी सकाळी 7 ते 11 पर्यंत फळभाज्या , किराणा व बँकेचे व्यवहार करण्यासाठी सकाळी 12 पर्यंत सूट देण्यात आली असून या नंतर मात्र जो कोणी विनाकारण रस्त्यावर फिरत आहे त्यांना मात्र परळीतीळ पोलीस प्रशासन मात्र दंडुक्यानेच चांगलाच चोप देत असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्याना नागरपालिकेमार्फत दंड लावला जात आहे.

    परळी तालुक्याची परिस्थियी पाहता सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव चांगलाच वाढला असून मृत्यूवचे प्रमाणही वाढले आहे.अश्या नाजूक परिस्थितीत जनतेने आपली व आपल्या परिवाराची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. अश्या परिस्थितीत ही काही लोकांना आपल्या जीवाची अजिबात पर्वा दिसून येत नाही अश्या लापर्वा लोकांना मात्र परळीतीळ पोलीस प्रशासन मात्र दंडुक्याचा चोप देतांना कमी करत नाही.