अल्कोहोल
अल्कोहोल

बलात्कार प्रकरणातील आरोपीसोबत पोलिस झिंगल्याचा धक्कादायक प्रकार बीडमध्ये उघडकीस आला आहे. आरोपीला न्यायालयात हजर करणारे पोलिस आरोपीसोबत दारु पित बसले होते. याप्रकरणी या दोन्ही पोलिसांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे.

    बीड : बलात्कार प्रकरणातील आरोपीसोबत पोलिस झिंगल्याचा धक्कादायक प्रकार बीडमध्ये उघडकीस आला आहे. आरोपीला न्यायालयात हजर करणारे पोलिस आरोपीसोबत दारु पित बसले होते. याप्रकरणी या दोन्ही पोलिसांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे.

    सहायक फौजदार नामदेव धनवडे व हवालदार सत्यवान गर्जे अशी निलंबीत पोलिस अधिकाऱ्यांची नावे आहेत. एका मूकबधिर मुलीसोबत अत्याचार करणाऱ्या तुकाराम कुडूक या आरोपीला बीडच्या जिल्हा व सत्र न्यायालयाने वीस वर्षाच्या सक्तमजुरीची शिक्षा ठोठावलेय. या आरोपीला या दोन पोलिस अधिकाऱ्यांनी न्यायालयात हजर केले.

    यानंतर हे दोन्ही पोलिस एस पी ऑफीस जवळ असलेल्या एका हॉटेलमध्ये आरोपीसोबत चक्क दारू पीत बसले. एका स्थानिक वृत्तपत्राने याचे स्टिंग ऑपरेशन केले. यानंतर पोलीस अधीक्षकांनी यांची गांभीर्याने दखल घेत त्यांना तात्काळ बडतर्फ केले.