वीज कामगार कृती समितीचे परळीत टुल डाऊन पेन डाऊन करत जोरदार धरणे आंदोलन…

वीज वितरण कंपनीचे अधिकारी व कर्मचारी यांना फ्रंटलाईन वर्कसचा दर्जा देण्यासही विविध मागण्यांसाठी आज परळी येथील महावितरण कार्यालयात वीज कर्मचारी, अधिकारी, अभियंता, कंत्राटी कामगार, सहाय्यक व प्रशिक्षणार्थी यांनी काळ्या फिती लावुन टुल डाऊन पेन डाऊन करत धरणे आंदोलन इंटकचे प्रदेशाध्यक्ष दत्ताञय गुट्टे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.

    परळी : कोरोना काळात वीज वितरण कंपनीचे अधिकारी व कर्मचारी यांना फ्रंटलाईन वर्कसचा दर्जा देण्यासही विविध मागण्यांसाठी आज परळी येथील महावितरण कार्यालयात वीज कर्मचारी, अधिकारी, अभियंता, कंत्राटी कामगार, सहाय्यक व प्रशिक्षणार्थी यांनी काळ्या फिती लावुन टुल डाऊन पेन डाऊन करत धरणे आंदोलन इंटकचे प्रदेशाध्यक्ष दत्ताञय गुट्टे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.

    दरम्यान राज्य सरकारकडून व वीज कंपन्या व्यवस्थापनाकडून वीज कर्मचारी, अधिकारी, अभियंता, कंत्राटी कामगार, सहाय्यक व प्रशिक्षणार्थी हे महत्त्वाचे घटक असतांना सुध्दा यांना कोवीड-१९ महामारीच्या काळात फ्रंन्टलाईन वर्करचा दर्जा न देणे, कंपनी कामगार व त्यांचे कुटुंबातील सदस्यांचे तातडीने लसीकरण न करणे, संघटनांसोबत चर्चा न करता महामारीच्या काळात मेडिक्लेमच्या टी.पी.ए. मध्ये परस्पर बदल करणे, कोवीड १९ मुळे मृत्यु पावलेल्या कामगारांच्या वारसांना ५० लाखां ऐवजी रु.३० लाख सानुग्रह अनुदान देणे व वीज बील वसुलीसाठी कामगारांवर सक्ती करणे अशे नियम शासनाकडून करण्यात आले आहेत. त्यामुळे महावितरणच्या संयुक्त कृती समितीने आंदोलन केले. या संदर्भात त्वरित आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर हे आंदोलन असे पुढे चालु ठेवण्याचा इशारा इंटकचे प्रदेशाध्यक्ष दत्ताञय गुट्टे यांनी दिला.

    या संपात संयुक्त कृती समितीचे सुभाष मुंडे,दिगंबर तपासे, कृष्णा शिंदे ,बळीराम गीते, कांतीलाल मुंडे, ज्ञानोबा मुंडे, मच्छिंद्र तारळकर, सचिन सूर्यवंशी, डीआर मुंडे, लक्ष्मण मुंडे,सुरेश देशमुख,प्रशांत खाडे,अन्सारी फेरोज, सुरेश खाडे, बिडगर नागरगोजे, संगिता ताटे,पांडुरंग गिते आदी कर्मचारी वृध्द सहभागी होता.