राज्यातील ‘या’ जिल्ह्यात दमदार पावसाची हजेरी, नदी, नाले ओढ्यांना पूर तर पिकांचं नुकसान

बीड जिल्ह्यात रात्रभर दमदार मुसळधार पावसाने हजेरी लावली होती. यामुळं जिल्ह्यातील अनेक लघु प्रकल्प ओव्हर फ्लो झाले आहेत. तर नदी, नाले, ओढे हे दुथडी भरून वाहत आहेत. जिल्ह्यातील मनकर्णिका, मांजरा, कुंडलिका, सिंदफणासह अनेक लहान नद्यांना पूर आलाय. तर दुसरीकडे शेतातील उभ्या पिकांमध्ये पाणी शिरल्याने अतोनात नुकसान देखील झाले आहे.

    बीड : बीड जिल्ह्यात रात्रभर दमदार मुसळधार पावसाने हजेरी लावली होती. यामुळं जिल्ह्यातील अनेक लघु प्रकल्प ओव्हर फ्लो झाले आहेत. तर नदी, नाले, ओढे हे दुथडी भरून वाहत आहेत. जिल्ह्यातील मनकर्णिका, मांजरा, कुंडलिका, सिंदफणासह अनेक लहान नद्यांना पूर आलाय. तर दुसरीकडे शेतातील उभ्या पिकांमध्ये पाणी शिरल्याने अतोनात नुकसान देखील झाले आहे.

    तसेचं वादळी वारा आल्यानं ऊस, मका, कापूस पिके लोळली गेली आहेत. बीड जिल्ह्यात सर्वत्र मध्यरात्री विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाने हजेरी लावल्याने, जिल्ह्यातील प्रमुख नदी नाल्यांना पूर आल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

    दरम्यान या पावसामुळे जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये पुरेसा पाणी साठा उपलब्ध होणार आहे. मात्र काढणीला आलेल्या सोयाबीन, मूग, उडीद आदी पिकांना याचा फटका बसणार आहे.