बीडमध्ये पावसाचं रौद्ररूप; मुसळधार पावसात पूल गेला वाहून, अनेक गावांचा संपर्क तुटला

मुसळधार पावसामुळे बीड जिल्ह्यातील नदी-नाल्यांना पूर आल्याचं पहायला मिळत आहे. बीड जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे जनजीवन सुद्धा विस्कळीत झाल्याचं पहायला मिळत आहे. इतकेच नाही तर अनेक गावांचा संपर्क सुद्धा तुटला आहे.

    बीड : महाराष्ट्रातील विविध भागांत जोरदार पाऊस कोसळत आहे. मुसळधार पावसामुळे बीड जिल्ह्यातील नदी-नाल्यांना पूर आल्याचं पहायला मिळत आहे. बीड जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे जनजीवन सुद्धा विस्कळीत झाल्याचं पहायला मिळत आहे. इतकेच नाही तर अनेक गावांचा संपर्क सुद्धा तुटला आहे.

    बीड जिल्ह्यातील खळवट लिंमगाव येथील घटना भिमनाईक तांडयावर जाणाऱ्या रस्त्यावरील पूल पावसामुळे वाहून गेला आहे. पूल वाहून गेल्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. यासोबतच वडवणी सिंधफना नदी दुथडी भरून वाहू लागल्याने देवडी ते पात्रुड वाहतूक ठप्प झाली होती.

    दरम्यान खळवट लिमगाव, चिंचवड, हरिश्चंद्र पिंपरी गावाच्या रस्त्यावरून पाणी वाहत असल्याने काहीकाळ संपर्क तुटला होता. आज झालेल्या पावसामुळे पेरणीला वेग येणार आहे. या पावसाने आनंद व्यक्त केला जात आहे. नदी नाले भरून वाहत असल्याने तलावातील पाण्याची पातळी देखील वाढले आहे. यातच पुढील चार दिवस बीड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आल्यामुळे प्रशासनाच्या वतीने गावाकडच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.