serial rapist taxi driver punishment for 384 years

बीड (Beed) जिल्ह्यातल्या गेवराईमधल्या पाचेगावमध्ये एक अजब प्रकार घडला आहे. पाचेगावमधल्या ग्रामसभेने चक्क बलात्कार पीडितेला गावातून हद्दपार(rape victim not allowed to enter village) करण्याचा ठराव केला आहे. आश्चर्याची बाब म्हणजे या ठरावावर ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकाऱ्यांनी शिक्कामोर्तब केले आहे.

बीड : बीड (Beed) जिल्ह्यातल्या गेवराईमधल्या पाचेगावमध्ये एक अजब प्रकार घडला आहे. पाचेगावमधल्या ग्रामसभेने चक्क बलात्कार पीडितेला गावातून हद्दपार(rape victim not allowed to enter village) करण्याचा ठराव केला आहे. आश्चर्याची बाब म्हणजे या ठरावावर ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकाऱ्यांनी शिक्कामोर्तब केले आहे.

गावकऱ्यांनी पोलीस अधीक्षकांकडे या महिलेला गावबंदी करण्यासाठी निवेदन दिले आहे.या कारणामुळे मोठी खळबळ उडाली आहे. या सगळ्या प्रकाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. पुरोगामी महाराष्ट्रामध्ये हे काय चालले आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पाच वर्षांपूर्वी या महिलेवर बलात्कार करण्यात आला होता. या गुन्ह्यात आरोपींना शिक्षा देण्यात आली. मात्र त्यानंतर या पीडित महिलेच्या मुलीवरही अत्याचार करण्यात आला. हे प्रकरण दाबण्यासाठीच आपल्यावर गाव सोडण्यासाठी दबाव येत असल्याचा आरोप या महिलेने केला आहे.