
परळीत भाजप-राष्ट्रवादी एकत्र आल्याचे वृत्त आहे. परळी पंचायत समिती सभापती उर्मिला शशिकांत गित्ते यांच्याविरोधात बहुमताने अविश्वास ठराव मंजूर करण्यात आला. भाजप सदस्यांनी गित्ते यांच्या विरोधात राष्ट्रवादीला मदत केली. यामुळे मुंडे भावंडांतील राजकीय कडवटपणा दूर झाल्याची चर्चा परळीत रंगली आहे.
बीड : परळीत भाजप-राष्ट्रवादी एकत्र आल्याचे वृत्त आहे. परळी पंचायत समिती सभापती उर्मिला शशिकांत गित्ते यांच्याविरोधात बहुमताने अविश्वास ठराव मंजूर करण्यात आला. भाजप सदस्यांनी गित्ते यांच्या विरोधात राष्ट्रवादीला मदत केली. यामुळे मुंडे भावंडांतील राजकीय कडवटपणा दूर झाल्याची चर्चा परळीत रंगली आहे.
परळी पंचायत समितीवर राष्ट्रवादीचे वर्चस्व आहे. परळी पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे ७, भाजपचे ४ व राष्ट्रवादी पुरस्कृत एक असे एकूण १२ सदस्य आहेत. त्यापैकी भाजपचा एक सदस्य अपात्र ठरल्याने ११ सदस्य उरलेत.
सभापती गित्ते या नंदागौळ पंचायत समिती गणातून राष्ट्रवादीच्या सदस्य म्हणून निवडून आल्या आहेत, तर त्यांचे पती बबन गित्ते हे जनक्रांती सेनेचे संस्थापक आहेत. सभापती उर्मिला गित्ते यांच्याविरोधात पंचायत समितीतील राष्ट्रवादी आणि भाजपच्या ९ सदस्यांनी मिळून अविश्वास प्रस्ताव अविश्वास ठराव दाखल केला होता.
अविश्वास ठरावाच्या वेळी सभापती गित्ते या गैरहजर होत्या. उर्मिला गित्ते या स्वःता गैरहजर असल्याने १० हजर सदस्यांनी सभापती विरुध्द अविश्वास ठरावाच्या बाजूने हात उभे करुन मतदान केल्याने सभापतीविरोधात ठराव मंजूर झाला आहे. यावेळी भाजप सदस्यांनी राष्ट्रवादीला मदत केल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला जोर आला आहे.